Home /News /mumbai /

मोठा घोटाळा! वाडिया रुग्णालयाने पालिका आणि रुग्णांकडून उकळले पैसे, हा घ्या पुरावा

मोठा घोटाळा! वाडिया रुग्णालयाने पालिका आणि रुग्णांकडून उकळले पैसे, हा घ्या पुरावा

वाडिया रुग्णालयात रोज रुग्णांकडून पैसे उकळण्याचं काम सुरू आहे. जेरबाई वाडिया रुग्णालयाला पालिकेने पैसे दिले पण तरीही इथल्या रुग्णांना मोफत औषध दिली जात नाहीत.

मुंबई, 22 जानेवारी : रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी 10 हजार रुपये डिपॉझिट घेणाऱ्या वाडिया रुग्णालयाचे नवीन-नवीन घोटाळे रोज बाहेर येतायत. आता हेच बघा, कोणत्याही सरकारी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला सिरिंज किवा सुया या विकत घ्यायला रुग्णालय कधी सांगतं का? नाही, पण वाडिया मात्र सांगतं. पालिकेने नुकतेच 14 कोटी रुपये वाडियाला दिलेत. अशात आता तरी बाई जेरबाई वाडिया रुग्णालय शहाणपाने वागेल असं वाटत होतं. पण पत्यक्षात मात्र घडतंय वेगळंच. वाडिया रुग्णालयात रोज रुग्णांकडून पैसे उकळण्याचं काम सुरू आहे. जेरबाई वाडिया रुग्णालयाला पालिकेने पैसे दिले पण तरीही इथल्या रुग्णांना मोफत औषध दिली जात नाहीत. अगदी सिरिंज आणि हातातील ग्लोव्हजही हे रुग्णालय विकत घ्यायला लावतं. याच पुरावे म्हणजे औषधांचे पैसे भरल्याचं हे बिल. हॉस्पिटलच्या आतील औषधाच्या दुकानासमोर रांग लागते. असं पाहायला गेलं तर कोणत्याही सरकारी रुग्णालयात जेव्हा औषधांची गरज असते  तेव्हा ते रुग्णांच्या नातेवाईकांना नाही तर परिचारीका आणताता. त्यामुळे रुग्णालयाच्या आतील हे exclusive फोटो तुम्हाला इथली खरी कहाणी सांगातात. वाडियाने 23 कोटी रुपयांची औषध 2018-19 या वर्षात वापरली. याबद्दल स्वत: पालिकेने माहिती दिली आहे. म्हणजे औषधापायी पैसेही पालिकेकडून घ्यायचे आणि रुग्णांकडूनही. धर्मादायी संस्था म्हणून मिरवायचं आणि नफाखोरी करायची? अशी गत वाडिया रुग्णालयाची आहे. काही रुग्णाच्या नेतावाईकांशी बोललो असता आम्ही औषधं विकत घेतो अशी माहिती समोर आली. साधी सिरिंज किंवा सुईदेखील विकत घ्यावी लागते. यावर वाडिया रुग्णलयाच्या सीईओ मिनी बोधनवाला यांना प्रश्न विचारण्याता आला. त्या म्हणाल्या की, 'दोन्ही रुग्णालयात पालिका आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्यांना सगळ्या बाबी माहिती आहेत. हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं अधिक बोलू इच्छित नाही.' वाडियाचा सगळा मतलबी कारभार न्युज18 लोकमतने उघड केला आणि सत्या लोकांच्या समोर आणलं. करदात्या मुंबईकरांचे पैसे हे केवळ पगारावर उडवले जातात. त्याची दखल सरकारनेही घेतली आणि यावर विशेष बैठक मंत्रालयात पार पडली. पण वाडिया रुग्णालयाचा कारभार काही बदलला नाही. वाडिया रुग्णालय सरकारी की खाजगी? वाडिया रुग्णालय हे वाडीया या धर्मदाय संस्थेच आहे, सरकारी  नाही. पण ज्या रुग्णालयाच्या एकूण खर्चापायी 85टक्के रक्कम जर  मुंबई महानगरपालिका देत असेल तर त्या रुग्णालयाला खाजगी म्हणावं का?  लालबाग परळ भागातील गिरणी कामगारांच्या कुटुंबातील महिला आणि मुलांना मोफत उपचार मिळावा म्हणून याची स्थापना केली गेली. वाडिया रुग्णालयाला सरकारनं पेसे दिले आणि पालिकेनेही. 1926 साली हा करार नौरोसजी वाडिया रुग्णालय आणि पालिका अधिक राज्य सरकार असा झाला. तर 1928 साली बाई जेरबाई लहान मुलांचे रुग्णालय या संदर्भात हा करार मुंबई मनपा आणि वाडिया ट्रस्ट यांच्यात झाला. ही सगळी पार्श्वभूमी असतानाही वाडिया ट्रस्ट मनामनी कारभार करत आहे. पालिकेला न विचारात घेता खाटा वाढवण्यात आल्या आहेत. कर्मचारी वाढवले गेले, किती रुग्णांना मोफत उपचार दिला याचा साधा हिशेबही नाही. जर पालिकेला ही ट्रस्ट जुमानत नाही तर गरीब बिचाऱ्या रुग्णांची काय कथा?
First published:

Tags: Mumbai news

पुढील बातम्या