वाडिया हॉस्पिटल 'व्हेंटिलेटर'वर: मनसे आक्रमक, हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही- शर्मिला ठाकरे

वाडिया हॉस्पिटल 'व्हेंटिलेटर'वर: मनसे आक्रमक, हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही- शर्मिला ठाकरे

  • Share this:

मुंबई,13 जानेवारी: बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि प्रसूतीगृह या दोन्ही हॉस्पिटलमधील कर्मचारी आजपासून तीन दिवस धरणे आंदोलन करत आहेत. लाल बावटा जनरल कामगार युनियनकडून हे धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर सहभागी झाले आहेत. आम्ही हात जोडून विनंती करतो, आमचे हात जोडलेलेच राहू द्यावे, कोणत्या ही परिस्थितीत हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही, हे निश्चित सांगते, असे आश्वासन शर्मिला ठाकरे यांनी दिले आहे.

आम्ही गेल्या काही दिवसांपासून फॉलप घेत आहेत. मुंबई मध्यमवर्ग जपले पाहिजेत. प्रत्येकालाच मोठी 'हिंदुजा'सारखी परवडणार नाहीत, असेही शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सांगितले. बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, आरोग्य मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, या संदर्भात मिटिंग लावावी. महापौरांच्या उपस्थितीत हा विषय सोडवता येईल. स्टाफ पगार नाही अशी स्थिती, स्टाफ हे कुंटूब पगारावर चालते, बाळा नांदगावकर यांनी महापालिका समवेत राज्य आरोग्य विभाग मिटिंग करावी.

दरम्यान, वाडिया हॉस्पिटल प्रशासनाने नाही म्हणून नव्या रुग्णांचे अॅडमिशन थांबवली आहेत. तसेच उपचार घेत असलेल्या 300 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर मॅटर्निटी डिपार्टमेंटमधील 100 पेशंट घरी पाठवले आहेत. जे रुग्ण भरती आहेत, स्थिर आहेत, काहीजणांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशांनाही घरी पाठवण्याचा घाट हॉस्पिटलने घातला आहे. तुटपुंजी कमाई, हॉस्पिटलचा अव्वाच्या-सव्वा खर्च कसा करायचा? असा प्रश्न असताना आता रुग्णांना कुठे न्यायचा असा सवाल कुटुंबियांसमोर आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील..

स्थानिक सेना आमदार अजय चौधरी हे आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारकडून आरोग्य विभाग मदत करून वाडिया हॉस्पिटल टिकले पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत. त्यांच्या कानावर विषय घातला आहे, कामगार मागण्या पूर्ण करू, असे आवाहन आमदार चौधरी यांनी दिले आहे.

13 ते 15 जानेवारी या कालावधीत हॉस्पिटलच्या बाहेर कर्मचाऱ्यांकडून निदर्शने केली जाणार आहेत. हॉस्पिटलला अनुदान नसल्याने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद केले आहे. तर बालरुग्णांची होणारी हेळसांड या आंदोलनातून मांडण्यात येणार आहे. महापालिका आणि राज्य शासनाकडून वाडिया हॉस्पिटलला 200 कोटींचा निधी देण्यात येणार होता. पण, तो अजून देण्यात आलेला नसल्याने हॉस्पिटलमधील औषधसाठा संपत आला आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांचे पगारही न झाल्याने आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 12:04 PM IST

ताज्या बातम्या