S M L

वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढणार, मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मेट्रो मार्ग 4 अ हा कासारवडवली ते गायमुख हा सुमारे 2.7 किमी यामध्ये दोन नवीन स्थानके येणार आहेत.

Sachin Salve | Updated On: Jan 12, 2018 10:17 PM IST

वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढणार, मुख्यमंत्र्यांची मंजुरी

 12 जानेवारी : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 144 व्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार कासारवडवली ते गायमुख पर्यंत (मेट्रो 4 अ) करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर परिसरातील सर्व मेट्रो रेल्वेच्या कामांचे कार्यारंभ आदेश 2018पर्यंत देऊन कामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची144 वी बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी फडणवीस म्हणाले, मुंबई शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 8 हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वसई–भाईंदर खाडीवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश देण्यात यावेत. भिवंडी परिसरातील ट्रान्सपोर्ट हब आणि लॉजिस्टिक पार्कचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या डब्ब्यांची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी, यासाठी उत्पादक कंपन्यांबरोबर बोलणी करण्यात यावी. तसेच मोनोरेल्वेचा नवा मार्ग सुरू झाल्यानंतर त्याचे प्रवासी भाडे हे मेट्रो रेल्वेच्या समकक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मेट्रो मार्ग 4 अ हा कासारवडवली ते गायमुख हा सुमारे 2.7 किमी यामध्ये दोन नवीन स्थानके येणार आहेत. या मार्गासाठी सुमारे 949 कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गामुळे सन 2021मध्ये दीड लाख प्रवासी क्षमता वाढणार असून 2031 मध्ये ही क्षमता एकूण 13.44 लाख एवढी होणार आहे. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो 4 मार्ग 32.3 किमीचा असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 10:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close