फेसबुकवर व्हल्गर मेसेज आला तर अशी करा तक्रार, या अभिनेत्रीने केलं ट्वीट

फेसबुकवर व्हल्गर मेसेज आला तर अशी करा तक्रार, या अभिनेत्रीने केलं ट्वीट

सोशल मीडियावर जर कुणी व्हल्गर मेसेज पाठवला तर त्याबदद्ल कुठे तक्रार करायची असा प्रश्न आपल्याला पडतो. अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनाही असाच एक अनुभव आला. त्यांनी तक्रार दाखल केल्यावर मुंबई पोलीस आणि सायबर सेलने त्याची लगेच दखल घेतली.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : तुम्हाला फेसबुकवर कधी व्हल्गर मेसेजचा सामना करावा लागला आहे का? अशा वेळेस फेसबुकवर फक्त निषेध व्यक्त करून भागत नाही किंवा त्या व्यक्तीला अनफ्रेंड करून, ब्लॉक करूनही उपाय निघत नाही. मग नेमकी कुणाकडे तक्रार करायची असा प्रश्न आपल्याला पडतो.

अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती यांना फेसबुकवर असाच एक व्हल्गर मेसेज आला. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ट्विटरवर मुंबई पोलिसांना मेसेज पाठवला. त्यांचा हा मेसेज सायबर सेलकडे पाठवण्यात आला.

लॅकोस्टा माफिसा या नावाच्या कुणीतरी इसमाने त्यांना हा फेसबुकवर हा मेसेज पाठवला होता. मुंबई पोलिसांनी त्यांच्या या तक्रारीची लगेच दखल घेतली. सोशल मीडियावर अशा पद्धतीने महिलांना टार्गेट केलं जाऊ नये यासाठी मी हे पोलिसांच्या लक्षात आणून दिलं, असं सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या.

मुंबई पोलिसांनी सुचित्रा कृष्णमूर्ती यांच्या मेसेजवर प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियाबद्दलची तक्रार नोंदवायची असेल तर 100 हा नंबर डायल करून तुम्ही तक्रार दाखल करू शकता. तुम्ही ट्वीट करूनही पोलिसांची मदत मिळवू शकता, असंही पोलिसांनी यावर लिहिलं आहे.सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी आपल्याला आलेल्या मेसेजबद्दल पोलिसांना ट्विटरवर माहिती दिली आणि ही तक्रार लगेचच सायबर सेलकडे वळवण्यात आली. त्यामुळे तुम्हालाही सोशल मीडियावर असा अनुभव आला तर त्याबदद्ल तुम्ही पोलिसांना तातडीने कळवू शकता.

======================================================================================================

VIDEO: लोकसभेत नवनीत राणा भडकल्या, आझम खान यांच्या वक्तव्यावरून गोंधळ

Published by: Arti Kulkarni
First published: July 26, 2019, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading