News18 Lokmat

मुंबईच्या व्हीजेटीआयमध्ये प्राध्यापकाकडून तरुणीचा विनयभंग, न्यूज18लोकमतच्या दणक्यानं गुन्हा दाखल

परीक्षा फॉर्मवर सही घेण्यास गेलेल्या विद्यार्थिनीचा प्राध्यापकानंच विनयभंग केला. शरीरसुखाची मागणी करत नापास करण्याची धमकी या प्राध्यापकानं दिलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 28, 2018 03:05 PM IST

मुंबईच्या व्हीजेटीआयमध्ये प्राध्यापकाकडून तरुणीचा विनयभंग, न्यूज18लोकमतच्या दणक्यानं गुन्हा दाखल

मुंबई, 28 मे : मुंबईच्या नामांकित व्हीजेटीआय महाविद्यालयातील लज्जास्पद प्रकार समोर आलाय. परीक्षा फॉर्मवर सही घेण्यास गेलेल्या विद्यार्थिनीचा प्राध्यापकानंच विनयभंग केला. शरीरसुखाची मागणी करत नापास करण्याची धमकी या प्राध्यापकानं दिलीय. या प्रकरणी व्हीजेटीआय प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आलीय. मात्र तक्रार दाखल करून 10 दिवस उलटले तरी प्रशासनानं काहीही कारवाई केलेली नाहीय, अशी बातमी न्यूज18लोकमतनं दाखवली. त्यानंतर प्राध्यापकावर गुन्हा दाखल झालाय.

प्रशासन कारवाई करायला टाळाटाळ करत संबंधीत प्राध्यापकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप होतोय. यापूर्वीही या प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप झालेला आहे. मात्र तेव्हाही कारवाई झालेली नाही. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण शिक्षकांच्या हाती असतात. याचा गैरफायदा हे प्राध्यापक घेताना दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2018 01:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...