• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'विश्वासराव, मी मुख्यमंत्री बोलतोय'; 31 डिसेंबरच्या मध्यरात्री फोन येतो तेव्हा...

'विश्वासराव, मी मुख्यमंत्री बोलतोय'; 31 डिसेंबरच्या मध्यरात्री फोन येतो तेव्हा...

नवीन वर्षाच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि म्हणाले...

 • Share this:
  मुंबई, 3 जानेवारी : सध्या मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची फेसबुक पोस्ट बरीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संवादाबाबतची माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात की, - 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला होता. सुखद धक्का देणारा मा मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो. कोरोनाशी लढा देताना गेले वर्षभरात 98 अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. हजारो जण योद्धया प्रमाणे या आजाराशी झुंजले. कोरोना शहिदांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी 50 लाख आणि पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने मिळणारी 10 लाखांची मदत ही पथदर्शी आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी राज्याच्या प्रमुखांची अशी दिलासादायक भेट ही मनोबल वाढवणारी ठरली.
  मध्यरात्री मा मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मा मुख्यमंत्री महोदयांचा फोन... Posted by Vishwas Nangre Patil on Sunday, January 3, 2021
  वर्षाची सुरुवात उमेद वाढवणारी ठरली गेले वर्षभर दक्षिण मुंबईतील सुमारे 300 जणांच्या चोरीला गेलेल्या मालमत्ता हस्तगत केल्या होत्या. मंगळसुत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं ! चोर ज्यावेळी असा दागिना खेचतो त्यावेळी महिलेला मानसिक धक्का पोहोचतो. आमच्या विनंतीला मान देऊन मा मुख्यमंत्र्यांनी आम्ही चोरांकडून परत मिळवलेली 25 मंगळसूत्रे त्या त्या भगिनींना देऊ केल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले. आमच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. असाधारण आसूचना पदक प्राप्त पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि एएसआय मुनीर शेख यांचेही कौतुक झाले. एकंदरीत वर्षाची सुरुवात उमेद वाढवणारी ठरली! विश्वास नांगरे पाटलांच्या या पोस्टला खूप लाइक्स मिळत आहेत. तरुण विश्वास नांगरे पाटलांना आदर्श मानतात.
  Published by:Meenal Gangurde
  First published: