...तेव्हा पाचशे नव्हे 120 फाईल्स क्लिअर केल्या -विश्वास पाटील

एका महिन्यात पाचशे नव्हे फक्त 120 फाईल्स क्लिअर केल्याचा दावा विश्वास पाटलांनी केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2017 10:45 PM IST

...तेव्हा पाचशे नव्हे 120 फाईल्स क्लिअर केल्या -विश्वास पाटील

28 जुलै : झोपु योजनेत एका बिल्डरला मदत केल्याप्रकरणी माजी सीईओ विश्वास पाटील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेत. त्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसंच एका महिन्यात पाचशे नव्हे फक्त 120 फाईल्स क्लिअर केल्याचा दावा विश्वास पाटलांनी केलाय. कुटुंबातल्या काही व्यक्तींना हाताशी धरून काही लोकांनी बदनाम करण्याचा कट केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

विश्वास पाटील यांच्याशी आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी संजय सावंत यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली असता, विश्वास पाटील म्हणाले की, "माझ्या 34 वर्षांच्या नोकरीमध्ये कधीही मला साधा मेमो मिळाला नाही. निवृत्ती झाल्यानंतर माझ्याविरोधात बोललं जाऊ लागलं.  शेवटच्या महिन्यात एका महिन्यात पाचशे फाईल क्लिअर केल्या नाही. त्या शेवटच्या महिन्यात 120 फाईल क्लिअर केल्यात" असा दावा त्यांनी केला.

तसंच मालाड झोपु योजनेत बिल्डरांना दिलेली आॅर्डर ही एक्स पार्टी आहे. 1978 ला झोपडपट्टी विभाग म्हणून जाहीर झाला. 2003 ला एसआरएने एलवाय दिला. 2005 मध्ये तेथील झोपडपट्टीत राहणाऱे स्थानिक लिज बनवण्यासाठी आले होते. जर झोपडी मालक लिज करून देत नसेल तर शासनाने त्याच्या बाजून उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे त्या कंपनीशी माझ्या पत्नीचा काडीमात्र संबंध नाही असा दावाही त्यांनी केला.

त्या जागेवर 2001 मध्ये बिल्डर निवडला तेव्हा मी जिल्हाधिकारीही नव्हतो. सात-आठ वर्षांनंतर मी जिल्हाधिकारी झालो. जर आम्हाला संधी दिली असती तर आम्ही बाजू मांडली असती. एफएसआय देण्याचा अधिकार हा एसआरएला असतो. तो जिल्हाधिकाऱ्याला नसतो. दोन वर्षानंतर मी एसआरए सीईओ झालो तेव्हा ही फाईल हातातही घेतली नाही. उलट माझ्यानंतर ज्या अधिकाऱ्याने चार्ज घेतला त्याला हे कळलं असतं तर त्याने मला सांगितलं असतं. माझ्यावर झालेला हा खोटा आरोप आहे असंही पाटील म्हणाले.

'संदीप येवले भेटले होते'

Loading...

संदीप येवले हे माझ्याकडे 1-2 वेळा येऊन गेले होते. परंतु त्यांच्याबरोबरचे जे लोकं होते त्यांची अशी मागणी होती की तिथला बिल्डर बदलावा. त्यानुसार मी चौकशीसाठी अधिकारी पाठवले. जर 80 ते 90 कोटी रुपये खर्च झाले असेल तर बिल्डर बदलता येत नाही. जर बदलायचा असेल तर जुन्हा

''लस्ट फाॅर लालबाग'चं एक पानही चोरलं नाही'

'लस्ट फाॅर लालबाग' कादंबरी चोरीचा माझ्याच भावाने आरोप केला. पण मी गेली 34 वर्ष लिहितोय मला चोरी करण्याची काय गरज होती.  'लस्ट फाॅर लालबाग' मधलं एक पान जरी चोरी केलं असेल तर ते दाखवा असं आव्हानही त्यांनी दिलं.

काय आहेत विश्वास पाटलांवर आरोप ?

 जिल्हाधिकारी असताना त्यांनी मालाड पूर्वच्या एका

एसआरएतली जमीन नियमबाह्यपणे रामजी शहाना दिली

शहाच्या कंपनीवर पाटील यांची पत्नी चंद्रसेना पाटील

यांची संचालकपदी निवड झाल्यानंतरच हा लाभ

ती जमीन पुढे रसेश कनकिया या विकासकाला दिली

त्यानं 'कनकिया लेव्हल्स' हा आलिशान प्रकल्पासाठी वापरला

संबंधीत जमीन  एसआरएची होती, तिचा काही भाग

विक्रीकरता होता

एसआरएतला एफएसआय हा ३ होता, त्यामुळे

एसआरए-विक्रीतल्या जमीनीचा एफएसआय समान म्हणजे ३ हवा होता

 पाटलांनी तसं न करता विक्रीच्या जमीनीची जागा ही जास्त ठेवली,

 पाटील यांनी कनकिया लेव्हल्सकरता १६ हजार ४४१ स्क्वेअर मीटरची जागा दिली

खरंतर दोन्ही ठिकाणी समान एफएसआय ठेवण्यासाठी

कनकिया लेव्हल्सला ११३४० स्क्वेअर मीटर जागा द्यायला हवी होती

 याचाच अर्थ कनकिया लेव्हल्सला ४४ टक्के अतिरिक्त

दिली गेली असल्याचा पाटील यांच्यावर आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...