...आणि विश्वास नांगरे पाटलांची मुंबईत एंट्री, पहिले घेतली शरद पवारांची भेट

...आणि विश्वास नांगरे पाटलांची मुंबईत एंट्री, पहिले घेतली शरद पवारांची भेट

नाशिकमध्ये दीड वर्ष कर्तव्य पार पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा नांगरे पाटलांनी मुंबई गाठली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : नाशिक पोलीस आयुक्तपद सांभाळल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नुकताच विश्वास नांगरे पाटील यांनी पदभारही स्वीकारला आहे. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांगरे पाटलांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आज सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. मुंबई आल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत त्यांचीही पहिलीच भेट होती. शरद पवार आणि नांगरे पाटील यांच्यात मुंबईतील कायद्या आणि सुव्यवस्थेवर चर्चा केल्याची माहिती समोर आली.

नांगरे पाटील यांची मुंबईतून कोल्हापूरला बदली झाली होती. त्यानंतर कोल्हापूरमधून नाशिकला बदली झाली होती. नाशिकमध्ये दीड वर्ष कर्तव्य पार पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा नांगरे पाटलांनी मुंबई गाठली आहे. नाशिकमध्ये दीड वर्षांत त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे अलीकडे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यात नांगरे पाटील यांचाही नंबर लागला.

नांगरे पाटील यांनी नाशिक सोडत असताना भावूक झाले होते. त्यांनी नाशिकरांसाठी एक ऑडिओ संदेश शेअर केला होता.

'गेली दीड वर्ष आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा चार्ज दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी रवाना होत आहे. गेली दीड वर्ष या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शहरात काम करताना इथली माती, इथली माणसं, इथलं पाणी, इथला निसर्ग यांच्या प्रेमात माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना निश्चित अंतःकरण जड आहे. पण हा ऋणानुबंध कायम राहील. आपल्या संपर्कात राहीन, आपले आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा करतो. जय हिंद, असं म्हणून विश्वास नांगरे पाटलांनी नाशिककरांचा निरोप घेतला.

Published by: sachin Salve
First published: September 28, 2020, 2:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या