मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /विराट कोहलीने केलं आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतुक, VIDEO केला शेअर

विराट कोहलीने केलं आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतुक, VIDEO केला शेअर


मुंबईत वांद्रे रिक्लमेशनमध्ये नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या स्वागताताठी "वांद्रे वडरलँड" अवतरलंय.

मुंबईत वांद्रे रिक्लमेशनमध्ये नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या स्वागताताठी "वांद्रे वडरलँड" अवतरलंय.

मुंबईत वांद्रे रिक्लमेशनमध्ये नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या स्वागताताठी "वांद्रे वडरलँड" अवतरलंय.

मुंबई, 25 डिसेंबर :  जगभरात ख्रिसमसची धूम सुरू आहे. मुंबई सुद्धा ख्रिश्चन (mumbai christmas celebration) बांधव नाताळाचा सण उत्साहात साजरा करत आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने मुंबई महानगर पालिकेच्या वतीने  सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या या कामाचे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli ) कौतुक केले आहे. याबद्दल विराटने शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे (aditya thackery) आभार मानले आहे.

ख्रिसमसच्या निमित्ताने मुंबईतील वांद्रे परीसर, सी लिंकवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. याबद्दल एक व्हिडीओ विराट कोहलीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केला आहे.

अभूतपूर्व काम केलं आहे. शहर खूप सुंदर आणि उत्सवपूर्ण दिसत आहे, असं म्हणत विराटने आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. विराट कोहलीने आदित्य ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केल्यामुळे राजकीय क्षेत्रात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.

मुंबईत वांद्रे रिक्लमेशनमध्ये नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या स्वागताताठी "वांद्रे वडरलँड" अवतरलंय. मुंबईत वांद्रे परीसरात ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने राहतोय. त्यामुळे नाताळ सणापासून ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विद्यूत रोषणाईचा नेत्रदिपक अविष्कार या "वांद्रे वंडरलँड" मध्ये साकारण्यात आला आहे. मुंबईकरांनीही या नेत्रदिपक "वांद्रे वंडरलँड" पहाण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.

मुंबईत पहिल्यांदाच विद्यूत रोषणाईचा कलात्मक वापर करत नैत्रदिपक रोषणाई करण्यात आली. ही विद्यूत रोषणाई वांद्रे-वरळी सी लिंक वरतीही करण्यात आली आहे. रिलायंन्स जीओ पुरस्कृत या नेत्रदिपक सोहळ्याचं आयोजन युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Virat kohli