VIDEO: रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करणाऱ्या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून खेचलं, RPF अधिकारी ठरला देवदूत

VIDEO: रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करणाऱ्या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून खेचलं, RPF अधिकारी ठरला देवदूत

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा जीव आरपीएफ ऑफिसरमुळे वाचला आहे. जणू काही या तरुणाला दुसरं जीवनच मिळालं आहे.

  • Share this:

विरार, 26 फेब्रुवारी: आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या (Suicide Attempt) एका तरुणाचा जीव आरपीएफ ऑफिसरमुळे (RPF Officer) वाचला आहे. जणू काही या तरुणाला दुसरं जीवनच मिळालं आहे. विरार रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. जेव्हा या अधिकाऱ्याने त्या तरुणाचे प्राण वाचावले तेव्हा सर्वांना सुटकेचा नि:श्वास टाकला. विरार रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर तीन वर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे विरार आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार यांनी प्राण वाचवले आहेत

मूळचा ओडिसा राज्यातील असणारा 32 वर्षीय किशोर कुमार विरारमध्ये वास्तव्यास आहे. ओडिसातील राऊरकेलाचा तो रहिवासी आहे आईच्या निधनाची बातमी सहन न झाल्याने त्याने 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.20 च्या सुमारास हे टोकाचं पाऊल उचललं. विरार रेल्वे स्टेशन च्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर तो स्वतः जाऊन झोपला. इतक्यात विरार आरपीएफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार यांनी पाहिले असता तात्काळ धाव घेऊन किशोरला ओढत बाहेर काढले त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी अन्य आरपीएफ जवान धावून त्यांचे प्राण वाचवले त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

रेल्वे स्थानकांमध्ये बऱ्याचदा अशा घटना घडतात. त्यावेळी तैनात अधिकाऱ्यांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. काही वेळा नागरिकांच्या चुकीमुळे देखील या अधिकाऱ्यांना प्राणाची बाजी लावावी लागते. धावत ट्रेन पकडताना तोल गेल्यामुळे, रेल्वे ट्रॅक ओलांडल्यामुळे नागरिकांना आणि त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरपीएफ जवानांना संकटाचा सामना करावा लागतो. या घटनेमध्ये तर त्या इसमाने स्वेच्छेने मृत्यू कवटाळण्याचे ठरवल्याचे दिसत होते. यावेळी आरपीएफ जवानाने प्राणांची पर्वा न करता त्याचा जीव वाचवल्याने त्यांचे खूप कौतुक होत आहे. जणू काही त्या माणसाला जीवनदान मिळाले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 26, 2021, 9:21 AM IST

ताज्या बातम्या