जोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा!

जोडप्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा!

विरारमधील कोपरी येथे एका जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.

  • Share this:

 

विरार, 25 सप्टेंबर : विरारमधील कोपरी येथे एका जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विरार कोपरी येथे रोहन सिंग (वय 28) आणि कंचना सिंग (वय 24) हे पती-पत्नी असून, 'विघनहर्ता पार्क' इमारतीत रूम नं 105 मध्ये राहतात. ही घटना मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास उघडकीस आली. मयत कंचना ही बिल्डिंगचे पाणी सोडण्याचे काम करते. आज सकाळी बिल्डिंचे पाणी न सोडल्याने विचारण्यासाठी शेजारी गेले असता, आतून दार बंद होते.

दार ठोकल्यानंतरही प्रतिसाद न दिल्याने दरवाजा तोडून आत पाहिले असता, रोहन आणि कांचना यांनी वेगवेगळ्या ओढणीच्या साहाय्याने एकत्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस पंचनामा करीत आहेत.

 VIDEO : कुठून आला रे..?, मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 08:26 PM IST

ताज्या बातम्या