मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'त्याने तिचा खून केला आणि माझ्यावर चाकूने केले 17 वार...' विरारच्या ICICI बँकेतील श्रद्धा यांचा थरारक अनुभव

'त्याने तिचा खून केला आणि माझ्यावर चाकूने केले 17 वार...' विरारच्या ICICI बँकेतील श्रद्धा यांचा थरारक अनुभव

ICICI Bank Virar Robbery and Murder

ICICI Bank Virar Robbery and Murder

विरारमधल्या आयसीआयसीआय बँकेवर पडलेल्या दरोड्यातून वाचलेल्या बँकेच्या कॅशियर (Cashier) श्रद्धा देवरुखकर यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ती धक्कादायक घटना सांगितली आहे.

मुंबई, 20 ऑगस्ट: 'मी माझ्या डोळ्यांसमोर आमची असिस्टंट ब्रँच मॅनेजर योगिता चौधरीचा खून होताना पाहिलं. मी तिच्या केबिनमध्ये गेले तर माजी ब्रँच मॅनेजर अनिलकुमार दुबेनी माझ्या छाती, डोकं आणि खांद्यांवर 17 वेळा चाकूचे वार केले. मी सिक्युरिटी अलार्म वाजवला पण दुबेने केबिनचं काचेचं दार बंद करून घेतलं होतं,' विरारमधल्या आयसीआयसीआय बँकेवर पडलेल्या दरोड्यातून वाचलेल्या बँकेच्या कॅशियर (Cashier) श्रद्धा देवरुखकर (Shraddha Devrukhkar ICICI Bank) यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ती धक्कादायक घटना सांगितली आहे.

देवरूखकर यांच्यावर चाकूने 17 वार झाले होते त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन त्या 19 दिवसांनी घरी परतल्या आहेत त्यांच्या डोळ्यांसमोरून हा प्रसंग जात नाही. त्या म्हणाल्या, 'अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून तो प्रसंग जात नाही. त्या दिवशी मी आणि योगिता कॅशचा स्टॉक घेण्यासाठी बँकेत उशिरापर्यंत थांबलो होतो. रात्रपाळीचा सिक्युरिटी गार्ड यायचा होता. त्याचवेळी दुबे बँकेत आला आणि थेट योगिताच्या केबिनमध्ये घुसला. मला तिथली खुर्ची खाली पडल्याचा आवाज आल्यावर मी धावत योगिताच्या खोलीत गेले तर तिथं योगिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर दुबेनी त्याच्या हातातल्या चाकूने माझ्या छातीवर, डोक्यात, खांद्यांवर 17 वेळा वार केले. त्यानंतर अलार्म वाजवला पण दुबेनी काचेचं दार आतून बंद करून घेतलं होतं.' हिंदूस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा-नो पार्किंगमधील गाडी चालकासह टोईंग; पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO

श्रद्धा पुढे म्हणाल्या की, 'त्याने आपल्या सॅकमध्ये सोनं भरलं. मला बँकेच्या मुख्य दरवाज्याच्या किल्या सापडल्या आणि मी दार उघडलं. पण तोपर्यंत दुबेनी माझा पाठलाग करून माझ्यावर पुन्हा वार केले. त्याने मला बँकेच्या आत खेचण्याचा प्रयत्न केला पण माझा युनिफॉर्म रक्ताने माखलेला असल्याने तो मला पकडू शकला नाही आणि मी बाहेर पळाले. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी दुबेला पकडलं. मी माझ्या डोळ्यांसमोर योगिता चौधरीचा खून होताना पाहिला आहे.' श्रद्धा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिल्याचं पोलीस इन्स्पेक्टर सुरेश वार्डे यांनी सांगितलं.

हे वाचा-आधी खुर्चीला बांधलं, नंतर दिला इलेक्ट्रिक शॉक; पत्नीनेच केला पतीचा गेम

वार्डे म्हणाले, 'मुंबईतील पालघर जिल्ह्यातील विरारमधल्या (ईस्ट) आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank Virar) शाखेत त्याच बँकेच्या माजी ब्रँच मॅनेजरने चोरी करून त्याच्या माजी सहकारी महिलेचा खून केला आणि कॅशियर महिलेवर चाकूने 17 वेळा वार केल्याची घटना 29 जुलै 21 ला घडली होती. या घटनेत बँकेच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजर योगिता चौधरी यांचा मृत्यू झाला होता. कॅशियर श्रद्धा देवरूखकर या हॉस्पिटलमध्ये 19 दिवस उपचार घेऊन घरी परतल्या आहेत. दुबेने 3.38 कोटी रुपयांचं बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही माजी ब्रँच मॅनेजर अनिलकुमार राजदेव दुबे याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर 397 (दरोडा घालणे), 307 (हत्येचा प्रयत्न करणे), 302 (हत्या) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याची कार जप्त केली असून दुबे याला ठाण्यातील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.’

First published:

Tags: Icici bank, Murder, Robbery, Theft