VIDEO : मास्तर म्हणाले होशील नापास पण झाला पास, पठ्याची मिरवणूक सरांच्या दारात

VIDEO : मास्तर म्हणाले होशील नापास पण झाला पास, पठ्याची मिरवणूक सरांच्या दारात

  • Share this:

मुंबई, 08 जून : आज दहीवीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांनमध्ये 'कही खूश कही गम' असं वातावरण आहे पण मुंबईतल्या कांजूरमार्ग मध्ये काही वेगळाच जल्लोष पहायला मिळाला. ढोल ताशांची  दणक्यात वाजत गाजत एका विद्यार्थ्याची मिरवणूक निघली.

ही मिरवणूक पाहणाऱ्यांना वाटलं की पोरानं मेरीट टक्केवारी मिळवून नाव काढलं असणार. पण तसं नव्हतं... त्याचं अस्सं झालं...कांजूरमार्ग परीसरातील एका खासगी क्लासच्या मास्तरांनी त्यांच्या या पठ्ठ्या विद्यार्थ्यांला ठासून सांगितलं होते...तू काही दहावी पास होत नाही...आता मास्तरांनीच असा आशिर्वाद दिल्यावर, पोरानं कच खाल्ली असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण हे पोरगं भलतंच बेरकी निघालं.

पठ्यानं ढास्सू अभ्यास केला आणि ठासून ५१ टक्के गूण मिळवले. मग काय बोलता, थेट मास्तरालाच ठस्सन देऊन पास होऊन दाखवणाऱ्या आपल्या बिलंदर पठ्याची, गळ्यात हार तुरे घालून त्याच्या दोस्तांनी चक्क ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकच काढली. आणि ती देखील मास्तराच्या क्लासच्या समोरूनच...पोरांनी जाळ आणि धूर संगटच केला ना राव... पोरांची सीना तानके निघालेली ही मिरवणूक सर्वच जण उत्सुकतेने पहात होते.

First published: June 8, 2018, 9:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading