Home /News /mumbai /

हाथरस घटनेच्या निषेध करण्यासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO

हाथरस घटनेच्या निषेध करण्यासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO

बॅनर खाली खेचल्यावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दोघांमध्ये सुरू असलेल्या बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले.

वसई, 06 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे. काँग्रेसचे नेते या प्रकरणाचा निषेध करत देशभरात आंदोलनं करत आहे. परंतु, वसईमध्ये निषेध करण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाथरस घटनेच्या निषेध करण्यासाठी वसईमध्ये स्थानिक काँग्रेस एकत्र आले होते. मात्र, काही कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. शहरातील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठ्या संख्येनं  कार्यकर्ते आंदोलनासाठी जमा झाले होते. योगी आदित्यनाथ सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयासमोर पोहोचले. या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला सुद्धा सहभागी होत्या. तहसीलदार कार्यालयाजवळ पोहोचल्यावर कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना पुढे येण्यास सांगितले. तेव्हा बॅनर खाली खेचल्यावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. जिल्हा सरचिटणीस रामदास वाघमारे आणि चिटणीस मकसूद मणियार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काही वेळातच दोघांमध्ये सुरू असलेल्या बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. पदाधिकारी एकमेकांना मारताना पाहून त्यांच्या समर्थकांनी यात उडी घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच राडा घातला. दारू माफियांची गुंडगिरी, कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला विशेष म्हणजे, काँग्रेसचे वसई विरार शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्यासमोरच ही हाणामारी झाली. यावेळी पदाधिकारी आणि नेत्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही मारहाण सुरूच होता.अखेर पोलिसांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना बाजूला केले त्यानंतर वाद निवळला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या