समोरून लोकल येत असताना महिला जवानाने रुळावर घेतली उडी, एकाचा वाचवला जीव LIVE VIDEO

शनिवारी 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी ग्रांट रेल्वे स्थानकावरील 1 क्रमाकांच्या प्लॅटफार्मवर ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शनिवारी 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी ग्रांट रेल्वे स्थानकावरील 1 क्रमाकांच्या प्लॅटफार्मवर ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • Share this:
    मुंबई, 27 डिसेंबर :  अचानक चक्क आल्यामुळे एक व्यक्ती रेल्वेच्या रुळावर कोसळला आणि काही क्षणात समोरून लोकल आली. पण वेळीच धाव घेऊन एका तरुण महिला जवानाने या व्यक्तीचे प्राण वाचवले. एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी घटना मुंबईतील (grant road railway station mumbai ) ग्रांट रेल्वे स्थानकावर घडली आहे. शनिवारी 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी ग्रांट रेल्वे स्थानकावरील 1 क्रमाकांच्या प्लॅटफार्मवर ही घटना घडली.  हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्लॅटफार्मवर जात असताना ईरानी कैजाद नावाच्या व्यक्तीला अचानक चक्कर आली. तोल सांभाळत असताना तो थेट रेल्वेच्या रुळावर कोसळला. स्थानकावर जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे हा प्रकार कुणाच्या लक्षात आला नाही. पण तिथेच तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे आणि रेल्वे सुरक्षा जवान कैलाश चंद्र  यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ईरानी कैजाद यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्यापासून काही अंतरावर दूर असलेल्या व्यक्तीला महिला जवानाने आवाज दिला. त्यानंतर त्यानेही मदतीसाठी धाव घेतली. तेवढ्यात समोरून लोकल आली होती. पण, मोटरमनने प्रसंगाचे गांभीर्य बघत लोकल जागेवरच थांबवली. त्यानंतर ईरानी यांना रुळावरून प्लॅटफार्मवर सुखरुप आणण्यात आले. त्यानंतर ईरानी यांच्यावर प्लॅटफार्मवरच प्राथमिक उपचार करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. लता बनसोडे आणि कैलास चंद यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. त्यांच्या या धाडसाबद्दल कौतुक होत आहे.
    Published by:sachin Salve
    First published: