मुंबईला 'व्हायरल'चा विळखा, तुम्हीही घ्या काळजी!

मुंबईला 'व्हायरल'चा विळखा, तुम्हीही घ्या काळजी!

जागोजागी असणारे खड्डे त्यात साचणारं पाणी, उघडी गटारं, अनाधिकृत झोपडपट्ट्या यामुळे अशा पसरणाऱ्या आजारांना आळा घालणं पालिकेच्या हाताबाहेर गेलं आहे.

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई 23 जुलै :  सुरुवातीला आलेला पाऊस, नंतर पडलेला उष्मा, दमट वातावरण यामुळे मुंबईकर आजाराने हैराण झाले आहेत. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू असा पसरणाऱ्या आजाराना मुंबईला विळखाच घातला असून सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज असल्याच मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. पावसामुळे असणारा ओलावा, अस्वच्छता यामुळे हे आजार पसरतात. पाण्याचा योग्य निचरा करणं, स्वच्छता ठेवणं आणि आहारात योग्य बदल केला आणि काळजी घेतली तर या साथीच्या आजारापासून बचाव करता येतो.

'हरभजन तुला लाज नाही वाटत', Chandrayaan-2च्या ट्वीटवर भडकले नेटिझन्स

मुंबईत ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये यावर्षी 70 टक्के वाढ झालीय. गेल्या आठ दिवसात रुग्णांची संख्या जास्त वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पाऊस न पडल्याने तापमानात झालेली वाढ या व्हायरलसाठी जबाबदार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. नेहमी तीन दिवसात बरा होणारा व्हायरल आता बरं  व्हायला आठ दिवसांचा वेळ घेतो.

लहान मुलं, गरोदर महिला आणि मधुमेहाचा रूग्णांना या वातावरणात मोठ्या प्रमाणात आजार होतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त रुग्ण असल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मधूकर गायकवाड यांनी दिलीय.

या रुग्णांमुळे महापालिकेच्या हॉस्पिटल्सवर ताण येतो. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारचे आजार पसरतात. मात्र आरोग्याच्या पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने सेवा अपुरी पडते त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. अस्वच्छता, जागोजागी असणारे खड्डे त्यात साचणारं पाणी, उघडी गटारं, अनाधिकृत झोपडपट्ट्या यामुळे अशा पसरणाऱ्या आजारांना आळा घालणं पालिकेच्या हाताबाहेर गेलं आहे.

World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढली तर दंड

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं आता आणखी महाग पडू शकतं. सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार याबद्दलच्या कायद्यात बदल करणार आहे. या कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना पकडले गेलात तर आता एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. सध्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास फक्त 200 रुपये एवढाच दंड आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री केली तर भरभक्कम दंड भरावा लागेल. शाळा, कॉलेजच्या परिसरात तंबाखूजन्य उत्पादवं विकली तरीही दंडाची जोरदार रक्कम भरावी लागणार आहे. शाळा किंवा कॉलेजच्या 100 यार्ड अंतरापर्यंत तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनं विकण्यालाही मनाई करण्यात आली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 23, 2019, 6:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading