S M L

लोकांना फुकट घेण्याची सवय,विनोद तावडेंचं वादग्रस्त वक्तव्य

कल्याणमधील गोदरेज हिल परिसरातील उद्यानाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

Sonali Deshpande | Updated On: Jun 15, 2017 10:10 PM IST

लोकांना फुकट घेण्याची सवय,विनोद तावडेंचं वादग्रस्त वक्तव्य

15 जून : 'आम्हा राजकीय नेत्यांना सगळंच फुकट द्यायची सवय असते. नागरिकसुद्धा जेवढे जेवढे फुकट मिळेल तेवढे बरं याच मूडमध्ये असतात,' असं वक्तव्य करून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

कल्याणमधील गोदरेज हिल परिसरातील उद्यानाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. मात्र हा देश आणि हे राज्य नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या करांवर चालत असल्याचा तावडे यांना विसर पडल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2017 10:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close