आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय- विनोद तावडे

आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय- विनोद तावडे

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या गोंधळाबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.

  • Share this:

24 जुलै : मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या गोंधळाबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.

यावर विनोद तावडेंनीही आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. ते म्हणाले, ' त्यांनी उच्च शिक्षण मंत्री रविंद्र वायकरांचा राजीनामा मागितला असेल.  रजिस्ट्रारची बदली आम्ही नाही तर केंद्र सरकारने केलेली आहे. आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय.'

विद्यार्थ्यांचे अॅडमिशनचे दिवस असताना अजून निकाल लागलेले नाहीत. कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागू शकते असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 03:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading