S M L

'... तर आम्ही बायबल आणि कुराणही वाटू'

भगवदगीता वाईट आहे असे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीनं जाहीर करावं

Updated On: Jul 12, 2018 02:02 PM IST

'... तर आम्ही बायबल आणि कुराणही वाटू'

मुंबई, 12 जुलैः मुंबईतील महाविद्यालयामध्ये भगवदगीता वाटपावरुन भाजप सरकार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. राज्यातल्या नॅक ए आणि ए प्लस मान्यता प्राप्त महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांनी त्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले. यावर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, 'सरकार भगवदगीतेचं वाटप करत नसून, भिंवंडीतील भक्ती वेदांत या संस्थेने आमच्याकडे भगवदगीतेचं मोफत वाटप करण्याची मागणी केली होती. तसेच उच्च महातर भगवतगीतेचं वाटप कोणत्या महाविद्यालयांमध्ये करावं याबाबत उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं.'

पुढे तावडे म्हणाले की, 'भगवदगीता वाईट आहे असे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीनं जाहीर करावं. तसंच श्रीकृष्ण खोटं बोलत होते हेही त्यांनी स्पष्ट करावं,' असं आव्हानही तावडे यांनी यावेळी केले. परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या ए आणि ए प्लस श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या 100 भगवदगीतेचे संच संबंधित महाविद्यालयांमध्ये वाटप करण्याचे आदेश प्राचार्यांना देण्यात आले आहे.

सरकारच्या या निर्णयाचा आता विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. 'आमचा भगवतगीतेला विरोध नाही मात्र महाविद्यालयात ती आणू नये,' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता असावी. त्यामुळे सरकारला या आदेशावर पुन्हा एकदा विचार करायला हवा, असं विद्यार्थी संघटनांचं मत आहे.

हेही वाचाः

हेही वाचाः

Loading...
Loading...

आज ठाण्यात रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन, या आहेत मागण्या

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

पाकने केला पहिल्या शिख पोलीस अधिकाऱ्याचा अपमान, पगडी हिसकावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 02:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close