विनोद तावडे राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'वर

भाजप नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास एक तास चर्चा झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2018 04:47 PM IST

विनोद तावडे राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'वर

विवेक कुलकर्णी, मुंबई, 04 जून : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मुलुंडमध्ये होत असलेल्या नाट्य संमेलनाचं आमंत्रण दिलं. पण  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून आमंत्रण न देता राज यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिल्याने भाजपनं शिवसेनेला डिवचलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

एकीकडे शिवसेना भाजपपासून दुरावली जात असताना राज यांना भाजप जवळ करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले होते. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर यथेच्छ टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी यापुढील निवडणुकीत युती न करता स्वबळाचा नारा दिला होता. तर आम्ही युतीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

दोन्ही पक्षांमध्ये सध्या विस्तवही जात नाहीये आणि त्याचवेळी तावडे यांनी राज यांची भेट घेणं म्हणजे शिवसेनेला डिवचलं असण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...