'अजित दादा कधी रागवतात तर, कधी हुंदका काढतात, हे सगळं नाटक'

'अजित दादा कधी रागवतात तर, कधी हुंदका काढतात, हे सगळं नाटक'

'राजकारणात सगळं वाईट नाही तसेच चांगलेही नाही, त्यामुळं राजकारणात युवकांनी आलंच पाहिजे तरच बदल घडेल.'

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 30 सप्टेंबर : अजित दादा कधी रागवतात तर, कधी हुंदका काढतात आणि हे सगळं नाटक असतं अशा शब्दात तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेंनी अजित दादा यांना टोला लगावलाय. ठाण्यात एका कार्यक्रमा बोलताना विनोद तावडेंनी हे वक्तव्य केलंय. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर जे घडलं त्यानंतर अजित पवारांचे पत्रकार परिषदेत डोळे पाणावले हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिलं यानंतर अनेक राजकीय चर्चा झाल्या पण पहिल्यांदाच सरकार मधील मंत्र्याने ही टीका केली आणि तेही जाहीर कार्यक्रमात यामुळे आता पुन्हा आरोप प्रत्यारोपांच्यां फैरी सुरू होणार आहेत.

राष्ट्रवादीत किरायादार घराचे 'मालक' झाले, मुंदडांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

'मी नव मतदार, विकासाचा भागीदार' या शिर्षकांतर्गत 'कफी विथ युथ' म्हणून ठाण्यात एका कार्यक्रमा दरम्यान मंत्री विनोद तावडे यांनी नव तरुण मतदारांशी संवाद साधला. नव मतदारांचे अधिकार, त्यांचे हक्क, त्यांचे कर्तव्य आणि सरकारने नवं मतदारांकरिता काय केले या सर्वांची माहिती देत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थांशी संवाद साधला.

साताऱ्याच्या राजकारणात ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंविरोधात लढणार नाहीत!

मात्र संवादाच्या अंती किती विद्यार्थी राजकारणात येऊ इच्छितात या विनोद तावडेंच्या प्रश्नांवर फक्त १६ मुलांनीच हात वर केला यांवर प्रतिक्रिया देताना 'दादा कधी रागवतो तर, कधी हुंदका काढतो आणि हे सगळं नाटक असत' अशा शब्दात तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेंनी अजित दादा यांना टोला लगावलाय आणि राजकारणात सगळे वाईट नाही तसे चांगलेही नाही असे सांगत राजकारणात येण्याचे तसेच डोळसपणे मतदान करा असे आवाहन त्यांनी युवकांना केले. याच दरम्यान त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून यायला नरेंद्र मोदींची गरज पडते, अमेरिकेलाही आपल्याबरोबर मैत्री करावी वाटते या शब्दात पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 04:06 PM IST

ताज्या बातम्या