विनोद तावडे पुन्हा अडचणीत;१३ अपात्र महाविद्यालयांना दिली मंजुरी

विनोद तावडे पुन्हा अडचणीत;१३ अपात्र महाविद्यालयांना दिली मंजुरी

दोन वेळा शिक्षण खात्यानं नाकारलेल्या अपात्र महाविद्यालयांच्या प्रस्तावांनाही तावडेंनी आपल्या अधिकारात मंजुरी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट: विविध महाविद्यालयांच्या 13 अपात्र प्रस्तावांना मान्यता दिल्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे वादात अडकले आहेत. यामध्ये 3 महाविद्यालयं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आहेत.

या प्रकरणातील सर्व कागदपत्र आयबीएन लोकमतकडे उपलब्ध आहेत. दोन वेळा शिक्षण खात्यानं नाकारलेल्या अपात्र महाविद्यालयांच्या प्रस्तावांनाही तावडेंनी आपल्या अधिकारात मंजुरी दिली आहे. मुंबईत तावडेंच्या मतदारसंघातील 2 अपात्र महाविद्यालयांनाही मंजुरी देण्यात आलीय. तर एक महाविद्यालय रमेश ठाकूर यांना बक्षीस म्हणून देण्यात आलंय.

First published: August 19, 2017, 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading