विनायक मेटेंनी गुपचूप अंधारात केलं शिवस्मारकाचं भूमिपूजन

विनायक मेटेंनी गुपचूप अंधारात केलं शिवस्मारकाचं भूमिपूजन

मेटे यांनी पुजाऱ्याला घेऊन नियोजित शिवस्मारकाच्या खडकावर पुन्हा भूमीपूजन केलं

  • Share this:

प्राजक्ता पोळ, प्रतिनिधी

मुंबई, 20 डिसेंबर : : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं गुपचूप अंधारात भूमिपूजन केल्याचं समोर आलं आहे. विनायक मेटे यांनी पुजाऱ्याला घेऊन शिवस्मारकाच्या खडकावर पुन्हा भूमिपूजन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी शिवस्मारकाचं अरबी समुद्रात जलपूजन केलं होतं. त्यानंतर विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा भूमिपूजन केलं आहे. मेटे यांनी काही अधिकारी आणि पुजाऱ्याला सोबत घेऊन भूमिपूजन केलं. मेटे यांच्या या कार्यक्रमावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. विनायक मेटे यांची भूमिका काय आहे, कारण काय आहे हे तेच सांगू शकतात. पण असं अंधारामध्ये भूमिपूजन करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली.

तर विनायक मेटे यांच्याकडून दुसऱ्यांदा भूमिपूजन कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. स्मारकाचं किती वेळा भूमिपूजन करणार हा मोठा प्रश्न आहे. याआधीही त्यांनी प्रयत्न केला होता. त्यावेळी बोट बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. पण तरीही या सरकारवर कोणता तरी दबाव आहे त्यामुळे असं कृत्य घडतंय अशी टीका मलिक यांनी केली.

राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लागू करण्यात आलं तरीही मेटेंकडून असा कार्यक्रम होत असेल तर यावर संशय निर्माण होत आहे. त्यांच्यावर कुठल्या तरी भोंदूबाबांचा परिणाम तर नाही ना अशी शक्यता वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही मलिक यांनी केली.

याआधी 24 आॅक्टोबर रोजी मेटे यांनी स्मारकाच्या पायाभरणीच्या पूजनाचा कार्यक्रम घेतला होता. परंतु, समुद्रात खडकाला बोट धडकून झालेल्या अपघातात सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला होता. विनायक मेटे यांच्यासह इतर मान्यवर आणि 40 पत्रकार असे 2 स्पीड बोटीतून शिवस्मारकाच्या ठिकाणाकडे रवाना झाले होते. मात्र, समुद्रात असलेल्या खडकाचा बोट चालकाला अंदाज न आल्यामुळे बोट धडकली.

ही धडक इतकी भीषण होती की, बोटीच्या खालच्या भागाला भगदाड पडलं. सुमारे 25 प्रवासी असलेली बोट दोन तास समुद्रात त्याच ठिकाणी अडकली होती. तोपर्यंत दुसरी बोट तिथं पोहोचली आणि 25 जणांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, ही बोट पाण्यात बुडाली. यावेळी सिद्धेश पवार हा बोटीतील केबिनमध्ये अडकला गेला. त्यामुळे बोटीसोबत समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर मेटे यांनी कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, अचानक मेटे यांनी पुजाऱ्याला आणि मोजक्याच समर्थकांना घेऊन शिवस्मारकाचं पुन्हा एकदा गुपचूप भूमीपूजन केलं. मेटे यांनी एका पुजाऱ्याला घेऊन हे भूमीपूजन केलं.

=========================

First published: December 20, 2018, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading