काय आहे विक्रोळी SRA घोटाळा प्रकरण ?

काय आहे विक्रोळी SRA घोटाळा प्रकरण ?

विक्रोळीच्या पार्कसाईट भागातील हनुमाननगरमध्ये एसआरए योजना, ओंकार बिल्डर्सचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प

  • Share this:

12 जुलै : मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमधला भ्रष्टाचार  पुराव्यासकट सामाजिक कार्यकर्त्याने माध्यमांसमोर उघड केलाय. संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्याने ओंकार बिल्डरने शांत राहण्यासाठी दिलेली लाचेची 1 एक कोटीची रक्कमच मीडियासमोर ठेवली. विक्रोळी पार्कसाईट भागातल्या हनुमाननगर योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरने सर्वांना कसे मॅनेज केले, याचे पुरावे सुद्धा येवले यांनी दिले. एवढंच नाहीतर  एसआरएचे नुकतेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी तथा ख्यातनाम लेखक विश्वास पाटील यांच्यावर या आरटीआय कार्यकर्त्याने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहे.

काय आहे प्रकरण?

विक्रोळीच्या पार्कसाईट भागातील हनुमाननगरमध्ये एसआरए योजना

ओंकार बिल्डर्सचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प

या प्रकल्पात अनेक अनियमितता असल्याचा स्थानिकांचा आरोप

प्रकल्पातल्या भ्रष्टाचाराविरोधात संदीप येवले यांचा आवाज

'झोपु'चे तत्कालिन सीईओ विश्वास पाटील यांच्याकडून येवलेंना मॅनेज करण्याचा प्रयत्न

ओंकार बिल्डर्सकडून येवलेंना 11 कोटींची लाचेची ऑफर

लाचेचा पहिला एक कोटी रुपयांचा हप्ता येवलेंना दिला

येवले एक कोटी रूपये घेऊन माध्यमांसमोर

=========================================================================

कोण आहेत संदीप येवले ?

संदीप येवले विक्रोळी भागातले

सामाजिक कार्यकर्ते

22 वर्षांपासून एसआरए आणि इतर

योजनांमधील भ्रष्टाचाराविरोधात लढा

आतापर्यंत संदीप येवलेंवर 4 वेळा हल्ला

लढाईसाठी घरंही विकलं

संदीप येवलेंवर भ्रष्टाचाराचे खोटे गुन्हे

विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी

=========================================================================

SRA योजना म्हणजे काय?

- झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजेच SRA

- १९९५ साली शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या नावाने ४० लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे हि योजना युतीच्या सरकारने प्रथम आणली

- मात्र २०१५ पर्यंत केवळ २ लाख घराचं या योजनेअंतर्गत बांधण्यात आली  

- सुरुवातीला १८० स्क्वेअर फुट नंतर २२५ आणि आता २६९ स्क्वेअर फुट घरे देण्यात येतात

- झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी एस आर ए चा फार मोठा हातभार आहे

- एस आर ए योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार

- मात्र  एस आर ए योजनेत बिल्डर आणि रहिवाशी यांच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे एस आर ए योजना रखडतात  

- तसेच झोपडपट्टी ते इमारत बांधण्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याने अनेक योजना अजूनही कागदावरच

First published: July 12, 2017, 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading