समर कॅम्पला गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू

समर कॅम्पला गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू

उन्हाळी सुट्टी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात गेलेल्या मनन कोकिन गोगरी या 13 वर्षीय मुलाचा विक्रमगड येथे तलावात बुडून मृत्यू झाला

  • Share this:

06 मे  : उन्हाळी सुट्टी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात गेलेल्या मनन कोकिन गोगरी या 13 वर्षीय मुलाचा विक्रमगड येथे तलावात बुडून मृत्यू झाला. मनन हा विक्रोळीच्या टागोर नगर मधील निलकमल सोसायटीत राहत होता.

तरुण मित्र मंडळ आयोजित हे शिबीर पालघरच्या विक्रमगड येथील साजन नेचर पार्क येथे होते. १ मे ला 120 मुलांना घेऊन तरुण मित्रा मंडळ गेलं होतं. 3 मे ला दुपारी पोहण्यासाठी 60 मुलांना घेऊन आयोजक येथील तलावात उतरले. काही मुलांना पोहता येत होते तर काहींना नाही.

मननला पोहता येत नव्हते तो पोहणे शिकण्यासाथी पाण्यात उतरला त्याने जीवरक्षक जॅकेट न घालता पाण्यात उतरला आणि खोल पाण्यात जाऊन बुडाला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. 4 मे रोजी पहाटे 4 ला पहाटे त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विक्रमगड पोलिसांनी आयोजक जतीन गांगर, डॉली गांगर, जुबेन छावडा तसंच रिसॉर्ट मॅनेजर विशाल सकपाळ आणि विनायक देशमुख यांना अटक केली आहे.

मुलांना शिबिराला पाठवताना हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा

- मुलाला कोणत्या शिबिराला पाठवताय?

- मुलांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था कशी आहे?

- शिबीर सरकारमान्य आहे का ?

- शिबिरादरम्यान डॉक्टर सोबत आहेत का?

- शिबिराचे आयोजक, प्रशिक्षकांचा तिथल्या जागेचा अभ्यास आहे का?

- शिबिरादरम्यान सुरक्षाव्यवस्था असणार आहे का?

- कोणत्या पद्धतीची सुरक्षाव्यवस्था शिबिरादरम्यान असेल?

- ज्या ठिकाणी शिबीर होणार आहे तिथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था आहे का?

- जास्त मुलं घेऊन जाण्याची क्षमता शिबिराच्या आयोजकांची आहे का?

First published: May 6, 2017, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading