Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे सरकारविरोधात भाजपचा आणखी एक नेता मैदानात, विखे पाटलांनी केली खरमरीत टीका

ठाकरे सरकारविरोधात भाजपचा आणखी एक नेता मैदानात, विखे पाटलांनी केली खरमरीत टीका

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभाराने शेतकरी उध्वस्त झाला आहे, असा घणाघात विखे पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभाराने शेतकरी उध्वस्त झाला आहे, असा घणाघात विखे पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभाराने शेतकरी उध्वस्त झाला आहे, असा घणाघात विखे पाटील यांनी केला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

शिर्डी, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरून भाजपच्या विविध नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करण्यात येत आहे. यामध्ये आता राधाकृष्ण विखे पाटील यांनीही उडी घेतली आहे. राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभाराने शेतकरी उध्वस्त झाला आहे, असा घणाघात विखे पाटील यांनी केला आहे.

शेतीमालाच्या वाहतूक आणि विक्री व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. सरकारकडून कोणत्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे जगाचा पोशिंदाच आज अडचणीत सापडला आहे. शेतकरी आज दूध ,भाजीपाला, धान्य पुरवत आहेत. मात्र तरीही शेतकरीच आज मोठ्या संकटात आहे. अनेक अडचणींचा सामना करत शेतकरी राबतोय. शेतीमालासाठी असलेली पणन व्यवस्था आज आहे कुठे ? असा सवाल करत भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सरकारवर निशाना साधला आहे.

आनंदाची बातमी: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

अत्यावश्यक असलेला शेतीमाल साठवण आणि विक्री व्यवस्था निर्माण करण्याची गरज असून सरकारनेच विक्री आणि वाहतूक व्यवस्था निर्माण करावी अशी अपेक्षा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. राज्यातच अनेक ठिकाणी ऊसतोडणी कामगार अडकले आहेत. परप्रांतीय कामगारांचा प्रश्न तर आहेच मात्र अगोदर राज्यातील ऊसतोडणी कामगारांना घरी जाण्यासाठी राज्यसरकारने व्यवस्था करणं गरजेच असल्याचंही विखे पाटील म्हणाले.

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, लक्षात आणून दिला महत्त्वाचा मुद्दा

दरम्यान, याआधी भाजपकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, किरीट सोमय्या, नीतेश राणे यांनी लोकांना अन्नधान्य पुरवणं, वांद्रे इथं झालेली गर्दी या मुद्द्यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

First published:

Tags: Corona