— News18Lokmat (@News18lokmat) October 30, 2020विजय वडेट्टीवार आज नागपूर दौऱ्यावर आहे. ते म्हणाले, मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत. आपल्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नाही तर ओबीसी समाज महत्त्वाचा आहे. ओबीसीसह इतर समाजातील विद्यार्थी नोकरी मिळावी, याची वाट बघत आहेत. त्यांचं वय वाढत चाललं आहे. त्यांना न्याय कुणी द्यावा, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी समाजासाठी नोकरभरती सुरु करावी, या मागणीसाठी ओबीसी समाज जर रस्त्यावर उतरला तर आपणही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे. हेही वाचा... OBCसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता सैनिकी शाळांमध्येही मिळणार आरक्षण दरम्यान, देशात जातीच्या लोकसंख्येनुसार त्या त्या वर्गासाठी आरक्षण द्यावं, ही आमची जुनीच मागणी आहे. देशात ज्या समाजाचं जेवढं प्रतिनिधित्व, त्या समाजाला तेवढे टक्के आरक्षण द्यावं, अशी गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.