एवढी तूर लागवड होईपर्यंत कृषी विभाग काय करत होतं ? -विजय शिवतारे

एवढी तूर लागवड होईपर्यंत कृषी विभाग काय करत होतं ? -विजय शिवतारे

असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांकडील तुरीचा शेवटचा दाणा संपेपर्यंत सरकारने तूर खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी केली.

  • Share this:

26 एप्रिल : तुरीची मोठया प्रमाणात लागवड झाल्यानं यावर्षी उत्पादन वाढणार हा अंदाज कृषी विभागाला आला नव्हता का ? कृषी विभाग काय करत होता ? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांकडील तुरीचा शेवटचा दाणा संपेपर्यंत सरकारने तूर खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी केली.

फक्त 22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेली तूर खरेदी करण्याचा निर्णयही आम्हाला मान्य नसून जेवढी तूर शेतकऱ्याकडे आहे तेवढी सर्व खरेदी करण्याची लेखी मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येणार असल्याचंही शिवतारे यांनी सांगितलं.

तूर नाशवंत नाही, त्यामुळे गरज पडली तर सरकारने खाजगी गोडावून भाड्याने घेऊन साठवणूक करावी आणि बाजारात भाव वाढल्यानंतर विक्री करावी अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदी साठी 1000 हजार कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे, यामध्येही वाढ करावी आणि सर्व शेतकऱ्याची तूर खरेदी करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटू असंही शिवतारे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 08:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading