• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • SBI सह भारतीय बँका विकू शकणार विजय मल्ल्याची मालमत्ता, ब्रिटिश कोर्टाने दिली परवानगी

SBI सह भारतीय बँका विकू शकणार विजय मल्ल्याची मालमत्ता, ब्रिटिश कोर्टाने दिली परवानगी

त्यामुळे या बँका आता त्यांचं 14 हजार कोटी रुपयांचं कर्ज मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करून वसूल करू शकणार आहेत.

 • Share this:
  मुंबई, 19 मे : फरार उद्योगपती विजय मल्ल्याला(Vijay Mallya) कर्ज दिलेली भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)आणि इतर सरकारी बँकांसाठी खूशखबर आहे. लंडनमधील ब्रिटिश कोर्टाने विजय मल्ल्याच्याविरुद्ध निकाल दिला असून त्याच्या संपत्तीवर असलेलं सिक्युरिटी कव्हर हटवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विजय मल्ल्याला विविध बँकांनी मिळून दिलेल्या 9000 कोटीच्या कर्जाची व्याजासह झालेली 14 हजार कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. टीव्ही 9 हिंदीने ही बातमी दिली आहे. स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतातील इतर 12 बँकांनी मिळून कन्सॉर्शियम (Bank Consortium) स्थापन केलं होतं. त्याअंतर्गत मल्ल्याला 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं होतं. ते कर्ज बुडवून मल्ल्या लंडनला पळून गेला आहे. विजय मल्ल्याचं कर्ज वसूल करण्यासाठी त्याची संपत्ती विकण्याचा पर्याय या कन्सॉर्शियमकडे होता. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील एकमेव Covid लॅब उद्धवस्त पण त्याच्या संपत्तीला सिक्युरिटी कव्हर(Security Cover) असल्याने बँकाना ती विकून पैसे वसूल करता येत नव्हते म्हणून भारतीय बँकांच्या कन्सॉर्शियमने ब्रिटिश कोर्टात (British Court) यासंबंधी याचिका दाखल केली होती. त्या खटल्यात कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या कन्सॉर्शियमच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे या बँका आता त्यांचं 14 हजार कोटी रुपयांचं कर्ज मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करून वसूल करू शकणार आहेत. विजय मल्ल्यांचं प्रत्यर्पण तूर्तास नाही विजय मल्ल्यांचं भारताकडे प्रत्यर्पण करण्यासंबंधीचा हा खटला नव्हता त्यामुळे त्यांच्या प्रत्यर्पणाबद्दल अजूनही निश्चित माहिती उपलब्ध नाही. खरं तर प्रत्यर्पणासंबंधीचा ब्रिटिश न्यायालयातला खटला मल्ल्या हरला आहे पण त्या खटल्याचा अंतिम निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे मल्ल्याला कोणत्या दिवशी भारताकडे सोपवलं जाईल हे निश्चित झालेलं नाही. बँका असं वसूल करतील कर्ज स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील कन्सॉर्शियममध्ये एकूण 13 बँका आहेत. ज्यात बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, फेडरल बँक, इंडियन ओहरसीज बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनॅन्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी यांचा समावेश आहे. यात स्टेट बँकेनी (SBI) 1600 कोटी, पंजाब नॅशनल बँकेनी (PNB) 800 कोटी आणि आयडीबीआयने (IDBI) 800 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. या कन्सॉर्शियमने मल्ल्याला दिलेलं  9 हजार कोटींचं कर्ज आता 14 हजार कोटींवर पोहोचलं आहे. ब्रिटिश कोर्टाच्या निर्णयानंतर हे कन्सॉर्शियम विजय मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करून पैसे वसूल करेल.
  Published by:sachin Salve
  First published: