शिवसेनेच्या विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

शिवसेनेच्या विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

गेल्या 4 वर्षापासून रिक्त असलेलं विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतरच हे पद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी, मुंबई, 30 नोव्हेंबर : शिवेसेनेचे आमदार विजय औटी यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अपक्ष उमेदवार बच्चू कडू आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विजय औटी यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला.

विधानसभेत काही वेळापूर्वी या निवडीबाबतची औपचारिक घोषणा केली आहे. गेल्या 4 वर्षापासून रिक्त असलेलं विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतरच हे पद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यावर आता मोहर उमटली आहे.

विधानसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं याआधीच दावा केला होता, पण भाजपनं हे पद रिक्त ठेवलं होतं. आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पदावर आता नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली होती. त्यानंतर लगेच विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्याने या बैठकीत या पदाबाबत चर्चा करण्यात आल्याचंही बोललं जात आहे.

VIDEO : '...आता संघटनेत फूट पडू देऊ नका', अजित पवारांचं मराठा मोर्चेकऱ्यांना आवाहन

First published: November 30, 2018, 12:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading