काय आहे बँक खाती हस्तांतरण प्रकरण? राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक नोटीस बजावली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे बँक अकाऊंट एसबीआय या सरकारी बँकेतून अॅक्सिस बँकेत ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला होता. याच अॅक्सेच बँकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस होत्या. या प्रकरणावरुन अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयात एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. सरकारी बँकेतून कर्मचाऱ्यांचे बँक अकाऊंट खासगी बँकेत वळवल्याने राष्ट्रीय बँकेचं नुकसान झाल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता. अमृता फडणवीस vs विद्या चव्हाण रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटला आहे. आता हा वाद कोर्टात पोहोचला असून अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस कमालीच्या संतापल्या आहे. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या घरातील गृहकलह बाहेर काढत ऐकरी भाषेत हल्ला चढवला. 'आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण,आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!' असा इशाराच फडणवीस यांनी दिला.बँक खाती हस्तांतरण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवीन नोटीस बजावली आहे.@fadnavis_amruta वहिनी नोटीस मिळाली का ? https://t.co/pb1ncSjHJU
— Vidya Chavan (@Vidyaspeaks) January 7, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadanvis, BJP, Devendra Fadnavis, NCP