मातोश्रीच्या अंगणात सेनेचा पराभव; महापौरांना बंडखोरीचा फटका

शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान ज्या विधानसभा मतदारसंघात येतं, तिथूनच सेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वांद्रे पूर्व मतदारसंघातून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या झिशांत सिद्दीकी यांनी त्यांचा पराभव केला.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 01:50 PM IST

मातोश्रीच्या अंगणात सेनेचा पराभव; महापौरांना बंडखोरीचा फटका

मुंबई, 24 ऑक्टोबर : शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान ज्या विधानसभा मतदारसंघात येतं, तिथूनच सेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वांद्रे पूर्व या मतदारसंघातून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या झिशांत सिद्दीकी यांनी त्यांचा पराभव केला.

या पराभवाला सेनेतलीच बंडखोरी जबाबदार असल्याचं स्पष्ट होत आहे. या मतदारसंघातून सेनेच्या तृप्ती सावंत इच्छुक होत्या. पण महाडेश्वरांना तिकीट मिळाल्याने तृप्ती यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी 2 दिवस आधीच शिवसेनेनं तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Parli Election Result 2019: पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

या सगळ्याचा फटका सेनेला बसला आणि अंगणातच त्यांचा पराभव झाला. झिशांत सिद्दीकी यांनी त्यांचा पराभव केला.

पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे तृत्पी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सेनेनं सांगितलं. मुंबईच्या वांद्रे पूर्व विभागातून तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सामानाच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आलं. तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि निकटवर्तीयांमध्ये नाराजीचा सूर होता. तृप्ती सावंत या दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी असून त्या विद्यमान आमदार होत्या. 2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये तृप्ती यांनी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. पण यंदा त्यांना उमेदवारी नाकरण्यात आली.

Loading...

आपला पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारला असल्याचं महाडेश्वर म्हणाले. "जनतेचा कौल मी मान्य करेन आणि का हरलो याची मीमांसा करेन", असं ते म्हणाले.

अन्य बातम्या

महाराष्ट्रात वंचित उघडणार खातं, हा आहे मतदारसंघ

पश्चिम महाराष्ट्रात युतीला खिंडार, आघाडी 'पवार'फुल?

या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतय दिग्गज उमेदवारांना टक्कर!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...