जीवघेणा सेल्फी...तरुणाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

जीवघेणा सेल्फी...तरुणाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

धोकादायक ठिकाणांहून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात जीव गेल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 2 मे : मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केल्याचं याआधी अनेकदा पाहायला मिळालं आहे. आताही मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. ज्याच्या आधारे जीवघेणा धोका घेण्याचं टाळा, असा संदेश मुंबई पोलिसांनी दिला आहे.

धोकादायक ठिकाणांहून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात जीव गेल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी ट्वीट केलेल्या या व्हिडिओतही असाच एक तरूण सेल्फी घेताना दिसत आहे. गगनचुंबी इमारतीच्या अगदी टोकाला उभा असलेला तरुण क्षणात खाली कोसळतानाचं भयावह दृश्य कॅमेरात कैद झालं आहे.

सेल्फी घेण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाचा पाय घसरला. त्यानंतर तो थेट खाली कोसळला. यावेळी खाली कोसळता कशाचा तरी आधार घेण्याचा तरुणाचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी ट्वीट केलेला हा व्हिडिओ नेमका कोणत्या शहरातील आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र असा जीवघेणा धोका टाळण्याचं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

First published: May 2, 2019, 2:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading