VIDEO : ड्युटी मस्ट, धोधो पावसातही पोलीस काका मागे हटले नाही !

VIDEO : ड्युटी मस्ट, धोधो पावसातही पोलीस काका मागे हटले नाही !

  • Share this:

मुंबई, 05 जून : पहिल्या पावसाचं स्वागत काल अनेकांनी केलं तसंच पहिल्या पावसाची मजा देखील अनेकांनी लुटली. मात्र मुंबई पोलिसांचा एक कर्मचारी भर पावसात आपली ड्युटी बजावत होता. धो धो कोसळणारा पाऊस आणि या पावसात भिजत ट्रॅफिक पोलीस हवालदार नंदकुमार इंगळे हे वाहतूक मोकळं करण्याचं काम करत होते.

मुंबईच्या कांदिवली पूर्व येथील आकुर्ली भागात हे वाहतूक पोलीस ड्युटीवर तैनात होते. पावसामुळे या भागात वाहतूक कोंडी वाढू लागली हे पाहून पावसाची पर्वा न करता एक वाहतूक पोलीस भर पावसात आपल्या पाईंटवर उभा राहिले आणि त्यांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पावसात उभं राहून वाहतुकीचे नियोजन केलं.

या जवानाची कर्तव्य निष्ठा पाहून  ये जा करणाऱ्यांना पाहून ते मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह आवरला नाही अशाच एका वाहन चालकानं त्या पोलीस जवानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केलाय आणि तो फेसबुकवर पोस्ट केलाय. या पोलीस जवानावर कौतुकांचा वर्षाव होतोय. न्यूज १८ लोकमतचा ही या जवानाला सलाम...

First published: June 5, 2018, 11:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading