मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO : मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत, अपघातात केमिकल गळतीमुळे अनेक वाहने घसरली

VIDEO : मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत, अपघातात केमिकल गळतीमुळे अनेक वाहने घसरली

या घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत.

या घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत.

या घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 31 मे : मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. खेडमधील भोस्ते घाटात हा अपघात झाला आहे. केमिकलच्या टँकरला पाठीमागून कंटेनरची जोरदार धडक झाली आहे. टँकरमधून केमिकलची गळती झाली आहे. गळती झाल्यामुळे केमिकल महामार्गावर पसरले आहे. क्रिष्टल एसपी नावाचं केमिकल असल्याची पोलिसांची माहिती दिली आहे. गेल्या एक तासापासून महामार्ग ठप्प असून दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली आहे. केमिकल महामार्गावर पसरल्याने सहा ते सात दुचाकी घसरल्या आहेत. सायंकाळी 5: 30 वाजता झाला अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे ही वाचा-Weather Update: जाणून घ्या पुढच्या 4 तासांत कोणकोणत्या जिल्ह्यात कोसळणार सरी बातमी अपडेट होत आहे...
First published:

Tags: Accident, Mumbai, Pune

पुढील बातम्या