Home /News /mumbai /

Video : बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे अन् आदित्य ठाकरे आमने-सामने; काय झालं बोलणं?

Video : बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे अन् आदित्य ठाकरे आमने-सामने; काय झालं बोलणं?

इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी बंडखोरी करणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का होता.

    मुंबई, 4 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पक्षात बंडखोरी करून मुख्यमंत्रिपद पटकावले. आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध  केले आहे. शिंदे सरकारने बहुमताचा 144 चा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. सरकारने 144 बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली. तर 3 आमदार हे तटस्थ राहिले होते. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाच मोठे नेते बहुमत चाचणीला गैरहजर असल्याचे समोर आले. इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी ंबडखोरी करणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. आदित्य ठाकरे दोन्ही दिवशी विधानसभेत हजर होते. यावेळी त्यांच्यासमोर बंडखोर आमदार आले. त्यांना पाहतान आदित्य ठाकरेंनी आपली नाराजी बोलून दाखविली. अशाच एका वेळी बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे आमने सामने झाले. आणि आदित्य ठाकरेंनी आपली खदखद बोलून दाखवली. काय म्हणाले आदित्य ठाकरे... यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, एवढे जवळचे असून असं काही कराल हे वाटलं नव्हतं. काय सांगाल मतदारसंघात...असं कराल खरंच अपेक्षित नव्हतं. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होतं. हे तुम्हाला माहिती आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या