• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आदित्य ठाकरेंना अजित पवारांच्या मुलाची टक्कर? पार्थची विद्यार्थी राजकारणात एंट्री
  • VIDEO : आदित्य ठाकरेंना अजित पवारांच्या मुलाची टक्कर? पार्थची विद्यार्थी राजकारणात एंट्री

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 04:56 PM IST | Updated On: Feb 7, 2019 04:56 PM IST

    सागर कुलकर्णी, मुंबई, 07 फेब्रुवारी : शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारही विद्यार्थी राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहे. पार्थ पवारांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठातील अनेक समस्या घेऊन पार्थ राज्यपालांकडे गेले होते. त्यांनी राज्यपालांना निवेदनही दिलं. विशेष म्हणजे, मावळ मतदारसंघामधून पार्थ लोकसभेची निवडणूक लढवणार, या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यातच राज्यपालांची भेट घेऊन पार्थ यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचे संदेश दिलेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी