मुंबई, 05 जुलै : पावसाळी अधिवेशनात (monsoon season Maharashtra) तालिका विधानसभा अध्यक्षांवर धावून जाणे आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित (12 BJP MLAs suspended ) करण्यात आले आहे. या 12 आमदारांची दालनात कशा प्रकारे गोंधल घातला होता, याचा व्हिडीओ समोर आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सभापतींच्या दालनात भाजप आमदारांनी कशा प्रकारे घेराव घातला होता, याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. भास्कर जाधव दालनामध्ये दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, यांच्यासह आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह आमदारांनी एकच गर्दी करून गोंधळ घातला होता.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 5, 2021
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या आमदारांनी कशा प्रकारे सभापतींच्या दालनात गर्दी केली होती, असं म्हणत मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सभागृहात बोलत असताना शिवसेनेचे आमदार आणि तालिका सभापती भास्कर जाधव यांनी दालनात काय घडलं यांची माहिती दिली.
'सभागृहात वाद झाला असला तरी बाहेर गेल्यावर आपण राजकीय व्यक्ती आहोत. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी दालनात गेलो तेव्हा उपसभापतींनी मला बसण्याचे सांगितले. पण मी बसलो नाही. मी काही इथं कायमचा सभापती नाही. तितक्याच रागाच्या भरात फडणवीस आले. त्यांचा राग असणे स्वभावाविक होते, त्यांना बोलू दिले नाही. तिथे चंद्रकांत पाटील आले त्यांना मी बसण्यास सांगितले. सभागृहात अनेक वादाचे प्रसंग येतात, मी तुम्हाला पुन्हा बोलायला देईल. पण त्यावेळी फडणवीस आणि त्यांचे सदस्य शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हते. इतर सदस्यांनी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. राडेबाज करणाऱ्या गुंडाप्रमाणे ते धावून आले, असा दावा जाधव यांनी केला.
आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी; इथे आजच पाठवा अर्ज
महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे. काही भाजपच्या नेत्यांनी बाहेर जाऊन सांगितले की, मी भाजपच्या आमदारांना शिवीगाळ केली. जर मी शिवीगाळ केली असेल तर माझ्यावर जी कारवाई करायची असेल तर नक्की करावी. मी जर चुकीचा शब्द वापरला असेल तर तुम्ही जी शिक्षा द्या ती भोगण्यासाठी मी तयार आहे, असंही जाधव म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.