मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; धारावीत लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी, नियमांचाही फज्जा

VIDEO: ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; धारावीत लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी, नियमांचाही फज्जा

Viral Video: मुंबईतील (Mumbai) नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या धारावी (Dharavi) परिसरात आज लसीकरणासाठी नागरिकांनी जीवघेणी गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 जुलै: मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा (Corona cases) कमी होत असला, तरी धोका अजून कायम आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा (Corona virus 3rd wave) धोका तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर लसीकरण (corona vaccination) गरजेचं आहे. पण लसीकरण केंद्रावरचं नागरिक तुफान गर्दी (Crowd) करत असल्याचं चित्र समोर आलं आहे. परिणामी कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात येण्याऐवजी धोका वाढताना दिसत आहे.

एकीकडे प्रशासनाकडून सातत्यानं लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात येत आहे. तसेच कोरोना नियमांची कठोर अमलबजावणी केली जात आहे. असं असताना नागरिक लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) मोकार गर्दी करत आहे. मुंबईतील (Mumbai) नेहमी गजबजलेला असणारा धारावी (Dharavi) परिसरात आज लसीकरणासाठी नागरिकांनी जीवघेणी गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून शेकडो लोकं एकत्र जमल्याचं दिसत आहे. अनेकांच्या तोंडाला मास्क नाही, तर सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडवला आहे.

हेही वाचा-'Corona Vaccine न घेणं ही माझी सर्वात मोठी चूक'; कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णाची खंत

एरवी रविवारच्या दिवशी मुंबईत कोरोना लसीकरण बंद ठेवण्यात येतं. मात्र आज मुंबईतील धारावी परिसरात विशेष लसीकरण शिबीर राबवण्यात येत आहे. पण शिबीर सुरू होण्यापूर्वीच मुंबईकरांनी धारावी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग तर पूर्णपणे फज्जा उडवण्यात आला आहे. याठिकाणी गर्दी नियंत्रणांत ठेवण्यासाठी कोणतही पोलीस यंत्रणा दिसत नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Dharavi, Mumbai, Viral video.