• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, नराधमाचे किळसवाणे कृत्य कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO : लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, नराधमाचे किळसवाणे कृत्य कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 09:56 PM IST | Updated On: Feb 19, 2019 09:56 PM IST

    19 फेब्रुवारी : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अखेर 9 दिवसांनी अटक करण्यात आली आहे. अश्रफ अली शेख असं या आरोपीचं नाव आहे. 2 आठवड्यांपूर्वी सीएसएमटी स्थानकावर कारशेडमध्ये जाणाऱ्या लोकलमध्ये एक महिला चुकून चढली. गाडी सुटली आणि या आरोपीनं तिच्या डब्यात उडी मारली. महिला घाबरली. अश्रफ तिच्या शेजारी येऊन बसला. ती धावून दारात आली. अश्रफ तिच्या मागे गेला आणि तिचा विनयभंग केला. मस्जिद स्टेशनला गाडी थांबत नाही हे पाहिल्यावर स्टेशन गेल्यावर महिलेनं गाडीतून उडी मारली. सुदैवानं तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली नाही, आणि ती कशीबशी सँडहर्स्ट रोड स्थानकापर्यंत पोहोचली. तिथे तिला रेल्व पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी जीटी रुग्णालयात नेलं. तिची प्रकृती आता स्थिर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading