ठाणे, 4 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अनेक दिवसांनी आपल्या स्वगृही परतले. आधी त्यांनी आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाला भेट दिली आणि त्यांना अभिवान केलं. आनंद दिघे यांच्या नेतृत्वातून मी तयार झाल्याचं एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात. आज मुंबई आणि ठाणे परिसरात तुफान पाऊस सुरू होता. अशा परिस्थितीतही त्यांनी आधी चैत्यभूमीला भेट दिली. त्यानंतर शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर जाऊन आशीर्वाद घेतलं. यानंतर ते ठाण्याला आले. येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री कोणत्याही महागड्या गाडीत नव्हते. तर बसमधून आमदारांसोबत या सर्व ठिकाणी फिरत होते. त्यांचा साधेपणा त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता. पावसात भिजत त्यांनी या ठिकाणी भेट घेतली.
विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या 50 लोकांच्या गटाला जो पाठींबा दिला त्याला दिलदारपणा लागतो. खरंतर हे सरकार अडीच वर्षांपूर्वीच यायला हवं होतं. पण, ठीक आहे. हे जनतेच्या मनातील सरकार आहे. आजच्या बहुमत चाचणीत आघाडीला 100 मतही मिळाली नाही. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. मेट्रोची कामे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली आहेत. यापुढेही त्यांच्या मार्गदर्नशनात प्रलंबित कामे होतील. आमचं सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारचा या सरकारला आशीर्वाद आहे. त्यामुळे आता कामे खूप वेगवान होणार आहेत.
आम्हीच खरी शिवसेना...
कोणी कितीही दावा करत असलं तरी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे निम्म्यापेक्षा जास्त आमदार असून अजूनही लोक येत राहतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आमदारावंर कारवाईच्या बातातीत विचारले असता, आम्ही सर्वांवर कारवाई करणार नाही. पण, जे नियमानुसार असेल ते होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.