Maharashtra Election Result 2019 :राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेचं 'इंजिन' यार्डातच!

Maharashtra Election Result 2019 :राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेचं 'इंजिन' यार्डातच!

मनसेला भोपळाही फोडता न आल्याने राज ठाकरे सारथी असलेलं पक्षाचं इंजिन पुढची पाच वर्ष यार्डातच राहणार आहे.

  • Share this:

मुंबई 24 ऑक्टोंबर : आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडणून द्या असं आवाहन करणाऱ्या राज ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसलाय. मनसेचा एकही उमेदवार जिंकून येणार नाही असं जवळपास स्पष्ट झालंय. त्यामुळे या ही निवडणुकीत मनसेचं इंजिन पुढच्या पाच वर्षांसाठी यार्डातच राहणार आहे. राज ठाकरेंनी शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांच्या प्रचार सभांनी थोडी वातावरण निर्मिती केली. मात्र त्याचा कुठलाही फायदा मनसेला झाला नाही. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते. नंतर मात्र सातत्याने त्यांना पराभव पत्कारावा लागलाय.

बंडखोरीनं भंगणार मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वप्न, वाचा Inside Story

लोकसभेच्या निवडणुका मनसेनं लढवल्याचं नव्हत्या. राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीत मनसेने मोजक्याच जागा लढवल्या होत्या. काही ठिकाणी त्याचं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं आपसात ठरलंही होतं. मात्र त्याचा काहीही फायदा राज ठाकरे यांना झाला नाही. EVMवरून राज ठाकरे यांनी देशव्यापी आंदोलन छेडलं होतं. निवडणुकांवर बहिष्कार घाला असं आवाहनही केलं होतं. मात्र असा बहिष्कार घालणं परवडणार नाही असं शरद पवारांनी राज यांना सांगितलं होतं. राज यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना आग्रह केल्याने शेवटच्या दिवसांमध्ये मनसेने विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच 'भाजप'ला धक्का, विदर्भानं बिघडवलं गणित!

त्याच दरम्यान राज यांना EDची नोटीस आसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र राज यांच्या भाषणांची धार कमी झालेली दिसली. राज यांनी भाजपवर टीका केली मात्र नरेंद्र मोदी आणि फडणवीसांवर थेट हल्ला करणं टाळलं. त्याचबरोबर मला सत्ता मिळणं शक्य नाही त्यामुळे मनसेला विरोधीपक्ष बनविण्यासाठी मत द्या असं त्यांनी केलेलं आव्हान लोकांना रुचलं नाही. आता पुन्हा पाच वर्ष राज यांना आपली पाळंमुळं घट्ट करण्यासाठी झगडावं लागणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2019, 3:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading