Maharashtra Election Result 2019 : 15 बंडखोरांशी बोलणं झालंय, त्यांचा भाजपला पाठिंबा- मुख्यमंत्री

Maharashtra Election Result 2019 : 15 बंडखोरांशी बोलणं झालंय, त्यांचा भाजपला पाठिंबा- मुख्यमंत्री

'आमचे काही मंत्री पराभूत झाले ते का पराभूत झाले याचा विचार करू. उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव धक्कादायक आहे.'

  • Share this:

मुंबई 24 ऑक्टोंबर : जनेतेनं अतिशय मोठा निर्णय दिला असून तो आम्ही मान्य करतो. सरकार स्थापनेसाठी राज्यातल्या जनतेनं आम्हाला कौल दिलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मागच्या वेळेसपेक्षा काही जागा कमी असल्या तरी आमचा स्ट्राइक रेट अतिशय चांगला आहे असंही त्यांनी सांगितलंय. बंडखोरीमुळे भाजपला फटका बसला असल्याचं त्यांनी मान्य केलं. जे बंडखोर निवडून आले त्यातल्या अनेकांशी माझं बोलणं झालं असून किमान 15 लोकांनी मला पाठिंबा देण्याचं मान्य केलं असा खुलासाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आमचं ठरलं असून त्याच प्रमाणं पुढे जाऊ असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, जे ठरलं त्यानुसारच पुढे जाऊ. आत्ताच या प्रश्नावर काहीही उत्तर देणार नाही. तुम्ही कितीही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देणार नाही. विरोधीपक्षांनी जास्त हुरळून जाऊ नये. त्यांना फार काही करता आलं नाही. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ऐकली आहे, आमचं सर्व काही सुरळीत होईल असंही ते म्हणाले. युती म्हणून लढलो आणि आमची तीच भावना कायम आहे असंही ते म्हणाले. आमचे काही मंत्री पराभूत झाले ते का पराभूत झाले याचा विचार करू. उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव धक्कादायक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

BJP ला अपेक्षेप्रमाणे यश नाही.. खडसे म्हणाले, NCP च्या कुरघोडीमुळे कन्येचा पराभव

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विधानसभेच्या निवडणुक निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. मात्र आभार मानतानाच भाजपलाही त्यांनी टोले लगावले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असंही त्यांनी सांगितलं. आधी सत्तेचं वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरलं त्याची फक्त आठवण करून देतो असंही ते म्हणाले.

विधानसभेची अटीतटीची लढत, प्रणिती शिंदे यांचा सोलापूरमध्ये विजय

उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाही एका व्यक्ती किंवा पक्षाभोवती प्रचार केंद्रीत राहू नये. जनतेनं अत्यंत जागरूकपणे मतदान केलंय. त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवलाय. काही जण गृहीत धरून चालतात त्यांनाही जनतेनं योग्य तो संदेश दिलाय असा टोलाही त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला. सत्ता स्थापनेही मला घाई नाही असंही त्यांनी सांगितलंय. भाजपने जागावाटपावेळी अडचण आहे म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले.  गरज पडली तर अमित शहाही चर्चेला येतील असंही ते म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2019, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading