Maharashtra Election Result 2019 : विधानसभा निकालाची ही आहेत 10 मुख्य वैशिष्ट्य

Maharashtra Election Result 2019 : विधानसभा निकालाची ही आहेत 10 मुख्य वैशिष्ट्य

या निवडणुक निकालांची अनेक वैशिष्ट्य असून अनेक रंजक घडामोडी घडल्याने हे निवडणूक निकाल ऐतिहासिक ठरणार आहेत.

  • Share this:

मुंबई 24 ऑक्टोंबर : सगळ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा आणि उत्सुकता असलेल्या विधानसभेचे निकाल आज लागले आणि राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने येणार हे स्पष्ट झालं. भाजपने केलेला आकड्यांचा दावा आणि एक्झिट पोल्सचे दावे यांची पोलखोल या निकालांनी केलीय. भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालेलं असलं तरी त्यांनी जी हवा निर्माण केली होती त्यानुसार त्यांची कामगिरी राहिलेली नाही हे स्पष्ट झालं. मात्र सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणं हे ही मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. या निवडणुक निकालांची अनेक वैशिष्ट्य असून अनेक रंजक घडामोडी घडल्याने हे निवडणूक निकाल ऐतिहासिक ठरणार आहेत.

15 बंडखोरांशी बोलणं झालंय, त्यांचा भाजपला पाठिंबा- मुख्यमंत्री

ही आहेत 10 मुख्य वैशिष्ट्य

1) भाजपचा 145 आणि महायुतीचा 220 पेक्षा जास्त जागा मिळविण्याचा विश्वास लोकांनी फोल ठरवला.

2) मंत्रिमंडळातल्या भाजप आणि शिवसेनेच्या 9 दिग्गज मंत्र्यांचा पराभव झाला. यात सर्वात धक्कादायक पराभव हा पंकडा मुंडे यांचा होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केलंय. अन्य मंत्र्यांमध्ये अनिल बोंडे, मदन येरावार, राज्यमंत्री बाळा भेगडे, विजय शिवतरे यांचा समावेश आहे.

3) विधानसभेसोबतच झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला.

4) 2014 मध्ये मिळालेल्या 122 जागाही भाजपला टिकवत्या आल्या नाहीत.

5) भाजप आणि शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळालं. महायुतीला 160 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना आक्रमक, प्रत्येक वेळी भाजपची अडचण समजून घेणार नाही- उद्धव ठाकरे

6) राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केलीय. राष्ट्रवादीला 2014मध्ये 41 जागा मिळाल्या होत्या यावेळी त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील.

7) काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नंतर सलग पाच वर्ष पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. तर सलग दुसऱ्यांदा सत्तेत येणारं फडणवीस यांचं पहिलंच सरकार ठरलंय.

8) 1985 नंतर राज्यात कुठल्याही एका पक्षाला बहुमताची मॅजिक फिगर असलेला 145 चा आकडा गाठता आलेला नाही. 1990 मध्ये काँग्रेस बहुमतापासून फक्त 4 जागा दूर होते. यावेळी दुसऱ्यांदा भाजप-शिवसेनेनं बहुमताचा आकडा पार केलाय.

9) ठाकरे घराण्याचे शिलेदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झालेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते ठाकरे घराण्याचे पहिलेच सदस्य ठरले आहेत.

10) या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची मुलं निवडून आलीत आणि काहींचा पराभव झाला. त्यामुळे अनेक 'तरुण तुर्क' विधानसभेत दिसणार आहेत.

First published: October 24, 2019, 6:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading