उतू नका, मातू नका नाहीतर माती होईल.. 'सामना'तून इशारा

'ईव्हीएम'मधून फक्त कमळेच बाहेर येतील,असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 12:36 PM IST

उतू नका, मातू नका नाहीतर माती होईल.. 'सामना'तून इशारा

मुंबई,25 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल स्पष्ट आणि सरळ आहे. उतू नका, मातू नका नाहीतर माती होईल, असा जनादेश देणारा निकाल 'ईव्हीएम'मधून बाहेर आला आहे.'ईव्हीएम'मधून फक्त कमळेच बाहेर येतील,असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होता. पण, 164 पैकी 63 ठिकाणी कमळे फुलली नाहीत. उतू नका, मातू नका नाहीतर माती होईल...असा भाजपला शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून इशारा देण्यात आला आहे.

उदयराजे भोसलेंच्या पराभव होणार, हे माहीतच होते..

साताऱ्यात उदयराजे भोसलेंचा पराभव होणार हे आम्हाला माहीतच होते. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांना राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये जायचेच होते तर 3 महिने आधी गेले असते. उदयराजे यांना निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणे चांगलेच महागात पडले आहे. साताऱ्यातील जनता सजग आहे. उदयराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. परंतु हे विसरून जनतेने पोटनिवडणुकीत मतदान केले. उदयराजे यांचे राजकारण आता जनतेला समजून चुकले आहे, अशा शब्दांत टीका केली आहे.

दरम्यान, निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. मात्र, आभार मानतानाच भाजपलाही त्यांनी टोलाही लगावला. सत्ता येते आणि जातेही, पण सत्तेची नशा कोणाच्या डोक्यात शिरली तर जनता ती उतरवते, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असेही त्यांनी सांगितले. आधी सत्तेचे वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरले त्याची फक्त आठवण करून देतो, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाही एका व्यक्ती किंवा पक्षाभोवती प्रचार केंद्रीत राहू नये. जनतेनं अत्यंत जागरूकपणे मतदान केलंय. त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवलाय. काही जण गृहीत धरून चालतात त्यांनाही जनतेनं योग्य तो संदेश दिलाय असा टोलाही त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला. सत्ता स्थापनेही मला घाई नाही असंही त्यांनी सांगितलंय. भाजपने जागावाटपावेळी अडचण आहे म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. गरज पडली तर अमित शहाही चर्चेला येतील असेही ते म्हणाले.

Loading...

आदित्य ठाकरेंचा दणदणीत विजय

युवासेना अध्यक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. आदित्य ठाकरे यांना 70 हजार 191 मतांनी विजय झाला आहे. येथे आदित्य ठाकरे आणि आघाडीचे उमेदवार सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होती. तर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनीही थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दरम्यान, सुरेश माने यांना 15296 मतं तर बिचुकले यांना 647 मते मिळाली आहेत.

निवडणुकीदरम्यान मुंबईतील वरळी मतदारसंघाची प्रचंड चर्चा होती. कारण, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली. कारण 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कोणताही सदस्य कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नव्हता. यानिमित्तानं निवडणूक लढवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य ठरलेत. आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असल्याच्या घोषणेमुळे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आघाडी येथे आपला सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जवळपास निश्चितच झाले होते.

VIDEO:ऊसाच्या फडातून थेट विधानसभेत...कसा आहे राम सातपुतेंचा प्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2019 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...