विदर्भ आणि अमरावती एक्स्प्रेस आता ठाण्याला थांबणार!

विदर्भ आणि अमरावती एक्स्प्रेस आता ठाण्याला थांबणार!

२ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईवरून गोंदियाला जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला जाताना ठाण्याला थांबा नव्हता

  • Share this:

मुंबई,31 मार्च : विदर्भ आणि अमरावती एक्स्प्रेस आता जाताना आणि येताना ठाण्याला थांबणार आहेत. मध्य रेल्वेनं हा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रवाशांची मागणी पूर्ण झाल्याची माहिती  खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी ट्विटरवरून दिलीय.

२ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईवरून गोंदियाला जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला जाताना ठाण्याला थांबा नव्हता. त्यामुळे ठाणे आणि आसपासच्या परिसरातल्या प्रवाशांना थेट सीएसटीएमला किंवा दादरला जावं लागत असे.  तर अमरावती एक्स्प्रेसला जाताना आणि येताना दोनही वेळेला ठाण्याला थांबा नव्हता. त्यामुळं प्रवाशांचे हाल होत असत.

विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये या दोनही गाड्या खूप लोकप्रिय आहेत. ठाणे आणि आसपासच्या उपनगरांमधून नागपूर, अकोला शेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2018 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading