Home /News /mumbai /

अजित दादांसमोर बॉलिवूडची झगमगाट पडली फिकी; हा VIDEO एकदा पाहाच!

अजित दादांसमोर बॉलिवूडची झगमगाट पडली फिकी; हा VIDEO एकदा पाहाच!

विकी कौशलला विमानतळावर अशी काही वागणूक देण्यात आली, त्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Kaushal and Katrina Kaif) यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. कतरिना कैफने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्याच्या काही मिनिटात 12 ते 15 लाख लाइक्स मिळाले आहेत. हा विवाहसोहळा जयपूरमध्ये पार पडला होता. मात्र, विकी-कतरिना मुंबईहून जयपूरला जाईपर्यंत आणि तिथून परतल्यानंतरही प्रसारमाध्यमांकडून या दोघांचा पाठलाग सुरुच आहे. विकी आणि कतरिना जयपूरला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) उभे असतानाच्या एका व्हिडीओची सध्या व्हायरल झाला आहे. 6 डिसेंबर रोजी विकी आणि कतरिना मुंबई विमानतळावरुन जयपूरला रवाना झाले होते. यावेळी छायाचित्रकारांनी विकी-कतरिनाचे फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हे ही वाचा-उद्धव ठाकरेंनी गद्दारांना दाखवला बाहेरचा रस्ता, रामदास कदम यांना मोठा धक्का यादरम्यान विकी कौशल विमानतळाच्या प्रवेशद्वाराने आत जात होता. विकी एकीकडे चाहत्यांना हात दाखवत होता, आणि दुसरीकडे मात्र एक मोठी व्यक्ती त्याच गेटमध्ये बाहेर पडत होती. ती दुसरी तिसरी कुणी नसून उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) होते. त्यांच्यासोबत मोठा फौज फाटा होता. ते बाहेर पडत असताना विकी कौशलला बाजूला करण्यात आलं, आणि मग दादांनी मोठा दिमाखात एन्ट्री घेतली. आपल्या देशात बॉलिवूडबद्दल मोठी क्रेझ आहे, मात्र राजकीय व्यक्तींसमोर त्यातही अजित पवारांसमोर बॉलिवूडची जादूही फिकी पडल्याचं दिसत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Airport, Ajit pawar, Vicky kaushal, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या