अमेरिकन नागरिकांना कॉल करून विकायचे व्हायग्रा, पण ऑर्डर घेऊन...

अमेरिकन नागरिकांना कॉल करून विकायचे व्हायग्रा, पण ऑर्डर घेऊन...

प्रतिबंध असलेल्या औषधी विक्री करणारी ही टोळी कॉल सेंटरद्वारे औषधं विकून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत होते

  • Share this:

सत्यम सिंग, प्रतिनिधी

मुंबई, 20 जानेवारी : फेक कॉल करून डेबिट आणि क्रेडीट कार्डची माहिती चोरून फसवणूक करण्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण, मुंबई पोलिसांनी अशा एका टोळीचा पदार्फाश केला आहे जी टोळी बेकायदेशीर कॉल सेंटरद्वारे प्रतिबंध घालण्यात आलेल्या औषधांची विक्री करत होती.

प्रतिबंध असलेल्या औषधी विक्री करणारी ही टोळी कॉल सेंटरद्वारे  षधं विकून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रांचने मुंबईतील मरोळ परिसरात असलेल्या ए.एम.कॉल कनेक्ट या कंपनीच्या सेंटवर छापा मारला. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेत असलेल्या नागरिकांना कॉल करून त्यांना व्हायग्रा, सियलीस, मेटाडोर सारख्या प्रतिबंधित औषध स्वस्तात विकण्याच्या आमिष देऊन ऑनलाइन त्यांची ऑर्डर घेऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडले जात होते. या टोळीने आतापर्यंत लाखो रूपयांना गंडा घातला आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनंतर या कॉलसेंटर धाड मारली असता त्याठिकाणी 22 इसम संगणकाला जोडलेला हेडफोन माईकवरुन विओ, आयपी, आटो डायलच्या  माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून औषध विक्रीच्या बहाण्याने डॉलरमध्ये पैसे घेत होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून राउटर सर्वर, कनेक्टर, संगणक, माइक, मोबाइल असं साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या टोळीने किती रुपयांना गंडा घातला, याचा तपास पोलीस करत आहे.

मोबाईल चोरांना अटक

दरम्यान,  मुंबईत रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. गेले काही दिवस मुंबईतल्या अंधेरी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे चोरटे सक्रीय झाले होते. मोबाइल चोरीच्या अशा प्रकारच्या अनेक तक्रारी लोकांकडून देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पथकासह सापळा रचला.

यादरम्यान गुन्हे शाखा दहाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली असता दोन संशयित व्यक्ती आढळून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून चोरीचे 4 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. तसंच मोटरसायकल सुद्धा जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

First published: January 20, 2020, 9:11 PM IST

ताज्या बातम्या