S M L
  • ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन

    News18 Lokmat | Published On: Jan 12, 2019 08:07 AM IST | Updated On: Jan 12, 2019 08:40 AM IST

    मुंबई, 12 जानेवारी : मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालं आहे. मराठी रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'शिक्षणाचा आयचा घो', 'लालबाग परळ', 'भिंगरी', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातील खट्याळ आजोबा, 'जब वुई मेट'मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तसंच दूरदर्शन वाहिनीवरील गजरा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close