गायक आदित्य नारायणचा नवा 'कार'नामा, रिक्षेला मारली धडक, पोलिसांनी केली अटक

गायक आदित्य नारायणचा नवा 'कार'नामा, रिक्षेला मारली धडक, पोलिसांनी केली अटक

गायक आदित्य नारायणला वर्सोवा पोलिसांनी कार अपघाताच्या संदर्भात अटक केलीय. आदित्यच्या कारनं एका रिक्षेला धडक दिली. त्यामुळे एक प्रवासी जखमी झाला.

  • Share this:

मुंबई, 12 मार्च: गायक आदित्य नारायणला वर्सोवा पोलिसांनी कार अपघाताच्या संदर्भात अटक केलीय. आदित्यच्या कारनं एका रिक्षेला धडक दिली. त्यामुळे एक प्रवासी जखमी झाला. पोलिसांनी आदित्यवर कलम 279 आणि कलम 338प्रमाणे कारवाई केलीय.

आदित्य नारायणनं काही महिन्यांपूर्वी रायपूर विमानतळावरही उद्दामपणा केला होता. बॅगेचं वजन जास्त झालं म्हणून पैसे भरायला नकार दिला होता. तिथल्या कर्मचाऱ्यांंचा त्यानं वाईट शब्दांमध्ये अपमान केलेला. त्याला नंतर क्षमाही मागायला लागली होती.

आदित्य उदित नारायणचा मुलगा. आतापर्यंत रामलीला, शापित, राजा को रानी से प्यार हो गया, बीवी नंबर वन सिनेमांत गाणी म्हटलीयत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...